Tarun Bharat

मारुतीनंतर आता टाटाच्याही गाडय़ा महागणार

नवे दर जानेवारीपासून लागू होणार ः वस्तूंच्या किमती नरमल्याचाही परिणाम पुढील काळात जाणवणार

नवी दिल्ली

 मारुती सुझुकीनंतर आता टाटा मोटर्सही पुढील महिन्यापासून म्हणजेच नवीन वर्षापासून आपल्या कार्सच्या किमती वाढवू शकते. कंपनी जानेवारी 2023 पासून आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमती वाढवण्याचा विचार करत आहे. टाटा मोटर्सचे पॅसेंजर आणि इलेक्ट्रिक व्हेईकलचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्रा यांनी एका मुलाखतीत याबाबतचा इशारा दिला आहे. मात्र, गाडय़ांच्या किमती किती वाढणार याबाबतचे कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. 

शैलेश चंद्र म्हणाले की, कंपनी 1 एप्रिल 2023 पासून लागू होणाऱया उत्सर्जन नियमांचे पालन करण्यास त्यांच्या कारच्या किंमती वाढविण्याचा विचार करत आहे. ते म्हणाले, ‘नियामक बदलांचा खर्चावर परिणाम होईल. वस्तूंच्या किमती नरमल्याचाही परिणाम पुढील काळात जाणवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

बॅटरी-नवीन नियमांचाही ईव्हीवर परिणाम

बॅटरीच्या किमतीही वाढल्या आहेत. ते म्हणाले, उत्पादनासाठी कच्च्या मालासह इतर गोष्टींच्या किंमतीवरचा खर्च पाहून त्याप्रमाणे किंमत वाढवण्याचे नियोजन केले जात आहे. चंद्रा म्हणाले की, बॅटरीच्या किमती आणि नवीन नियमांचा परिणाम ईव्हीवरही झाला आहे. टाटा मोटर्स पंच, हॅरियर, सफारी, नेक्सॉन, टियागो ईव्ही आणि नेक्सॉन ईव्ही सारख्या कार विकते.

जानेवारी 2023 पासून किमती वाढवणार

4 दिवसांपूर्वी देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने आपल्या कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली होती. महागाई आणि नियामक आवश्यकतांमुळे खर्चाच्या दबावामुळे जानेवारी 2023 पासून सर्व मॉडेल्सच्या किमती वाढवण्याची योजना असल्याचे कार कंपनीने सांगितले.

ऑडीची वाहनेही महागणार

जर्मन लक्झरी कार कंपनी ऑडी पुढील महिन्यापासून आपल्या भारतीय मॉडेल्सच्या किमती 1.7 टक्क्यांनी वाढवणार आहे. कंपनीने बुधवारी ही माहिती दिली. उत्पादन खर्च आणि ऑपरेटिंग कॉस्टमध्ये वाढ झाल्यामुळे वाहनांच्या किमती वाढविण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग ढिल्लन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘कंपनीचे व्यवसाय मॉडेल धोरण नफा आणि स्थिरता राखण्यावर आधारित आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे किंमत वाढवण्यात आली आहे.’

Related Stories

जागतिक नकारात्मकतेत शेअरबाजार घसरणीसह बंद

Amit Kulkarni

जीडीपीमध्ये घसरण होण्याचा क्रिसिलचा अंदाज

Patil_p

दुसऱया सत्रातही सेन्सेक्स तेजीत

Patil_p

एलआयसीची बंद विमा पॉलिसी सुरु करण्याची संधी

Patil_p

ऍमेझॉनच्या युपीआय ग्राहकांची संख्या 5 कोटीवर

Patil_p

LIC शेअर्सहोल्डरला देणार गुडन्यूज!

datta jadhav