@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
यंदा नीट परिक्षेत देशात प्रथम क्रमांकावर आलेल्या तनिष्का या विद्यार्थिनीने जेईई मेन्समध्येही यश मिळविले आहे. जेईई मेन्स परीक्षा मी केवळ सराव असावा म्हणून दिली, असेही तिने स्पष्ट केले आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षेपेक्षा इंजिनिअरींग प्रवेश परीक्षा अधिक अवघड होती, असेही मत तिने व्यक्त केले.
तनिष्का ही हरियाणाची असून तिचे वय सध्या 17 वर्षे आहे. नीटच्या परीक्षेत तिला 720 पैकी 715 गुण मिळाले होते. तिने आता जेईई मेन्समध्येही 99 टक्के पर्सेटाईल गुण मिळविले आहेत. आपल्याला डॉक्टरच व्हायचे आहे. मात्र जेईई मेन्स परिक्षा केवळ आपण स्वतःला सिद्ध करण्यासाठी दिली आहे, असे तिचे म्हणणे आहे. जेईई आणि नीटचा अभ्यास आपण एकत्रच केला. मात्र गणिताचा अभ्यास नंतर केला. यंदाची नीट परीक्षा जास्त लांबलचक होती. जीवशास्त्राचे प्रश्न सोडवायला आपल्याला 25 ऐवजी 50 मिनीटे लागली, असेही तिने नमूद केले.