Tarun Bharat

ठाणे, नवी मुंबईपाठोपाठ आता KDMC मध्येही सेनेला खिंडार

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

ठाणे, नवी मुंबईनंतर आता कल्याण-डोंबिवलीमध्येही शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. कल्याण-डोंबिवलीमधील 55 माजी नगरसेवकांनीही मुख्यमंत्री शिंदे यांना समर्थन दिले आहे. त्यामधील काही माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.

ठाण्यातील 66 माजी नगरसेवकांनी गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना पाठिंबा दर्शवला. त्यानंतर नवी मुंबई महापालिकेतील 38 पैकी 28 माजी नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला. या दोन धक्क्यांपाठोपाठ  शिवसेनेला कल्याण-डोंबविलीमधून तिसरा धक्का बसला. कल्याण डोंबिवलीतील जवळपास 55 माजी नगरसेवकांनी देखील शिंदे यांना समर्थन दिले आहे. गुरुवारी रात्री माजी नगरसेवक आणि सेनेतील पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला. काही नगरसेवक हे बाहेरगावी आहेत तर काही प्रकृती अस्वास्थ्यामुळे यावेळी उपस्थित राहू शकले नाहीत. तरी देखील सर्व नगरसेवकांचा शिंदेंना पाठिंबा असल्याचे उपस्थितांनी सांगितले. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीत देखील सेनेला मोठे खिंडार पडले आहे.  

हेही वाचा : प्रभाग रचना रद्द करा; चंद्रशेखर बावनकुळेंच निवडणूक आयोगाला पत्र

कल्याण हा सेनेचा तर डोंबिवली हा भाजपबालेकिल्ला आहे. मागील महापालिका निवडणुकीत सेना-भाजपाने स्वतंत्र निवडणूक लढवली. यावेळी सेनेचे 52 तर भाजपाचे 42 नगरसेवक निवडून आले होते.   

Related Stories

महाराष्ट्रातील कोरोनाबळींची संख्या 10 हजारांवर

datta jadhav

नौदलाचे मिग-29 के विमान अरबी समुद्रात दुर्घटनाग्रस्त

datta jadhav

अयोध्येत दर्शन घ्यायला आलोय, राजकारण करायला नाही- आदित्य ठाकरे

Archana Banage

आमच्या कार्यालयावर कोणत्या हक्काने मोर्चा काढता: संजय पाटील- यड्रावकर

Abhijeet Khandekar

यूपी : लस खरेदी जागतिक निविदेच्या अटी शिथिल

datta jadhav

ममतांचा पराभव करण्याचा भाजपचा निर्धार

Archana Banage