Tarun Bharat

फोंडा शहरानंतर शिरोडय़ात फ्लॅट फोडून 20 लाखाचा ऐवज लंपास

 वाजे शिरोडा येथील घटना : फोंडय़ात दिवसाढवळय़ा चोऱयाचे सत्र सुरूच

प्रतिनिधी /फोंडा

वाजे शिरोडा येथील निवासी गाळय़ातील दुसऱया मजल्यावरील रूपेश नाईक यांचा मालकीचा फ्लॅट अज्ञात चोरटय़ांनी फोडून सुमारे 20 लाख रूपये किमतीचे सोन्याचे दागिने रोकड लंपास केली. चोरटय़ानी मुख्य प्रवेशद्वारातील लोखंडी गेटची कडी तोडून फ्लॅटात प्रवेश घेतला. त्यानंतर बॅडरूमातील किमतीचे सोन्याचे दागिन्यासह चोरटे पसार झाले. चोरीची घटना काल बुधवारी सकाळी 11 वा. सुमारास घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

फेंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाजे शिरोडा येथील वेदा इमारतीच्या  दुसऱया मजल्यावरील फ्लॅटात हा प्रकार घडला. चोरटय़ानी मुख्य दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश घेतला. चोरटय़ांनी सोन्याचे किमती दगिने तसेच 50 हजार रूपये रोकडसह पळ काढला. फ्लॅटात कुणीच नसल्याचे साधून चोरटय़ांनी डाव साधला. रूपेश यांची पत्नी नातेवाईकांच्या लग्नासाठी बाहेर गेली होती तर रूपेश हा इमारतीच्या काही अंतरावर असलेल्या आपल्या मूळ घरी गेला होता. चोरटय़ानी इमारतीतील सीसीटीव्ही संचाची नासधूस केलेली आहे. मात्र बाजूला असलेल्या इमारतीत सीसीटीव्ही कॅमेऱयात चोरटय़ाचे चेहरे बंदिस्त झाले आहेत. चोरटयांना दागिन्याची बऱयापैकी पारख असून त्यानी फक्त असली सोन्याचे दागिने लंपास केले आहे. नकली दागिन्याला हात लावलेला नाही.

 याच धर्तीवर दोन दिवसापुर्वी 23 मे रोजी दिवसाढवळय़ा न्यु हाऊसिंग बोर्ड कुर्टी येथे दुसऱया मजल्यावरील फ्लॅट फोडून अज्ञात चोरटयांनी 12 लाख रूपये किमतीचे दागिने लंपास केले होते. दोन महिन्यापुर्वी बोरी सर्कल येथे अज्ञात चोरटय़ांनी फ्लॅट फोंडून दागिने लंपास केले होते. दोन्ही घटनेचा अद्यात तपास लागलेला नाही. सलग होणाऱया चोऱयामुळे फोंडा पोलिसांना छडा लावणे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. याप्रकरणी निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली फोंडा पोलीस अधिक तपास करीत आहे.

Related Stories

फोंडा शहरातील दृष्टिहीन सीसीटिव्ही कॅमेरे बदलणार तरी कधी?

Patil_p

ताकही फुंकून पिण्याची काँग्रेसवर वेळ!

Patil_p

जनसुनावणी केवळ दिखावा

Amit Kulkarni

पिसुर्ले येथील खनिज वाहतुकीला स्थगिती

Omkar B

हरमल किनाऱयावर काळय़ा रंगाचे तेलगोळे

Amit Kulkarni

‘बायो टॉयलेट’ योजना अद्याप कागदावरच

Patil_p