रंगीबेरंगी आकर्षक माठ उपलब्ध : लग्न-इतर कार्यात पारंपरिक माठांची गरज
प्रतिनिधी /बेळगाव
तुळशी विवाहानंतर आता लग्न कार्याला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे लग्नासाठी लागणाऱया माठांना मागणी वाढली आहे. बाजारात लग्नासाठी साधे आणि रंगीबेरंगी माठ उपलब्ध झाले आहेत. हिंदू परंपरेनुसार तुळशी विवाहानंतर लग्नाचे मुहूर्त काढले जातात. लग्न समारंभात माठ आवश्यक असतात. त्यामुळे माठांना मागणी वाढू लागली आहे.
आधुनिक युगात सर्व साहित्य स्मार्ट होत असले तरी लग्न आणि इतर कार्यात पारंपरिक माठांची गरज भासते. त्यामुळे माठाला तुळशी विवाहनंतर मागणी वाढत असते. वधूच्या लग्नासाठी साधे करेमाठ 50 रुपयांना एक तर रंगीबेरंगी माठ 80 ते 100 रुपयांना एक असा दर आहे. वराच्या लग्नासाठी काजणीचे साधे माठ 200 रुपये तर रंगीबेरंगी माठ 250 रुपये असा दर आहे. एका लग्नासाठी पाच लहान माठांची गरज असते. त्यामुळे माठांना पसंती दिली जात आहे.
तुळशी विवाहानंतर लग्नाची धामधूम सुरू होते. मुहूर्त शोधून लग्नकार्य केले जाते. या लग्नकार्यात कपडे, भांडी, सजावटीचे साहित्य आणि पारंपरिक पद्धतीने माठांची खरेदी केली जाते. बाजारात लग्न कार्यासाठी आकर्षक रंगीबेरंगी माठ विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकांचा कल आकर्षक माठ खरेदीकडे वाढला आहे. लग्नाच्या शुभ मुहूर्तावर या माठांना मागणी वाढत आहे.
लग्नकार्यांना सुरुवात
दरवषी तुळशी विवाहानंतर लग्नकार्याला सुरुवात होते आणि माठांना मागणी वाढते. एप्रिल आणि मे महिन्यात लग्नकार्ये अधिक असतात. त्या काळात लग्नाचे माठ अधिक प्रमाणात खरेदी केले जातात. मागील दोन वर्षात कोरोनामुळे लग्नकार्ये साधेपणात पार पडली. मात्र, यंदा धूमधडाक्मयात लग्ने होत आहेत. त्यामुळे माठांना मागणी वाढत आहे.
विनायक गुंजीकर, माठ विपेते