Tarun Bharat

विविध समस्यांसाठी पुन्हा नरेगा कामगारांचा मोर्चा

Advertisements

बेळगाव प्रतिनिधी – वेळेत वेतन द्यावे, केंद्र सरकारने निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करावा,कामगार व सुपरवायझर यांना स्मार्टफोन द्यावे, साहित्याच्या दरामध्ये वाढ करावी. यासह इतर मागण्यांसाठी नरेगा कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. वेळेत वेतन दिले जात नाही, ग्रामपंचायत मधील पीडीओकडे काम द्या म्हणून गेले असता काम नाही असे सांगितले जात आहे. केंद्र सरकारने रोजगार हमी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या निधीमध्ये कपात केली आहे. त्यामुळे आम्हाला काम मिळणे कठीण झाले आहे. तेव्हा केंद्र सरकारने रोजगार हमी योजनेच्या निधीमध्ये वाढ करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. गोकाक, हुक्केरी, खानापूर आणि बेळगाव तालुक्यातील कामगारांचा यामध्ये समावेश होता. त्यावेळी शिवाजी कागणीकर, डॉ. गोपाल धाबडे, कविता जारकिहोळी, आडव्याप्पा कुब्बरगी,काशिनाथ नाईक, सुवर्णा कोटले, महानंदा तलवार यांच्यासह कामगार उपस्थित होते.

Related Stories

बेळगुंदी-पिरनवाडी परिसरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी

Patil_p

विविध ठिकाणी गुरुपौर्णिमा

Amit Kulkarni

खानापूर तालुक्यात शुक्रवारी पंधरा कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद

Rohan_P

खानापुरात शेतीच्या कामामुळे लॉकडाऊन नको

Patil_p

तब्बल 13 लाखाचा दारूसाठा जप्त

Amit Kulkarni

वडगाव मंगाईदेवी आवारात रेणुकादेवी प्रतिकृती दर्शन सोहळा

Patil_p
error: Content is protected !!