Tarun Bharat

माणसाचे मांस आणि मलही खाणारे अघोरी…

बनारसच्या हरिश्चंद्र घाटासह इतर काही घाटांवर अघोरी पंथीयांचा एक जथ्था राहात आहे. त्यांचे जीवनमान आणि जगण्याची पद्धती आपल्या सर्वांच्याच अंगावर काटा उभा केल्याखेरीज राहणार नाही अशी आहे. हे अघोरी पंथीय मृत माणसाचे मांस खातात तसेच माणसाचा मलही त्यांच्या आहाराचा भाग असतो, असे त्यांची जीवनशैली जवळून पाहिलेल्या तज्ञांनी सांगितले आहे. हे अघोरी नरमुंडांच्या (माणसाचे डोके) माळा परिधान करतात. जवळपास विवस्त्र राहतात आणि स्मशानातील राख अंगाला फासून घेतात. आपल्याजवळ ते सर्वसामान्य माणसाला फिरकू देत नाहीत. आपले खाणे ते मानवी कवटीतून घेतात.

माणसाचे अगर अन्य प्राण्यांचे कच्चे मांसही त्यांना निषिद्ध नाही. मूत्रप्राशन हा त्यांच्या जीवनशैलीचा एक भाग आहे. हरिश्चंद्र घाटावर 24 तास चिता जळत असतात. दिवसभर दडून राहिलेले अघोरी रात्री 9 वाजता या घाटावर जमण्यास प्रारंभ होतो. ते स्वतःला बनारसच्या बाबा स्मशाननाथ यांचे भक्त म्हणवून घेतात. बाबा स्मशाननाथांच्या मंदिरात मद्याचा अभिषेकही ते करतात. मद्यप्राशन हा देखील त्यांच्या आहाराचा भाग आहे. बाबा किनाराम हे या अघोरींचे मूळपुरुष असल्याचे सांगण्यात येते. या बाबा किनाराम यांच्या नावाने बनारसमध्ये एक अघोर पीठही स्थापन करण्यात आले आहे. ज्यांना अघोरी बनायचे आहे, असे लोक त्यांच्या जथ्थ्यात समाविष्ट होतात. महाराष्ट्रातील धनंजय रमेश पतकी नामक एक व्यक्ती पाच वर्षांपासून अघोरी बनली आहे. त्यांनी अघोरी बनण्यासाठी प्रारंभी 27 हजार रुपये गुरुदक्षिणा देऊन अघोरी पंथाची दीक्षा घेतली होती. ते हरिश्चंद्र घाटाच्यानजीक एका हॉटेलात महिना 7 हजार रुपये भाडे देऊन राहतात.

अघोरी साधनेत माणसाच्या कवटीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या कवटीत प्रचंड दैवी सामर्थ्य असल्याची त्यांची श्रद्धा आहे. हे सामर्थ्य जागविल्यास अनेक अशक्मय गोष्टी करण्याचे सामर्थ्य माणसाला प्राप्त होते. मात्र, ही सिद्धी प्राप्त करणे अत्यंत कष्टप्रद असल्याचेही ते नमूद करतात. माणसांप्रमाणेच माकडाच्या कवटीचाही उपयोग ते करत असतात. काही अघोरी झोपडय़ांमध्ये राहतात. मात्र, ते कोणाही सर्वसामान्य माणसाला आत येऊ देत नाहीत. सर्वसामान्य लोकही त्यांच्या दुरून दर्शनानेही घाबरून जातात आणि जवळ जाणे टाळतात.

अशा या अघोरी पंथियांचा अभ्यास काही तज्ञांनी केला आहे. त्यांच्यावर काही पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत. सध्याच्या 21 व्या शतकात आधुनिकतेचे वारे सर्वत्र वाहात असताना अशा पद्धतीची जीवनशैली स्वेच्छेने स्वीकारणाऱया या अघोरी पंथियांसंबंधी घृणेची तसेच औत्सुक्मयाचीही भावना सर्वसामान्यांमध्ये आहे.

Related Stories

‘ग्लोबल वॉर्मिंग’चे महाआव्हान

Patil_p

चंद्रो तोमर यांच्या नावाने ओळखले जाणार नोएडामधील ‘शूटिंग सेंटर’

Tousif Mujawar

जगातील सर्वात उंच श्वान

Patil_p

‘गुरु-शनि’ महायुतीचा आज दिसणार नजारा

Patil_p

जगातील सर्वात छोटा देश

Patil_p

स्वतःच्या आनंदासाठी कापले दोन्ही कान

Patil_p