प्रतिनिधी /बेळगाव
हेस्कॉमने 2004-05 मध्ये तात्पुरत्या स्वरुपात पद भरती केली होती. त्यानंतर पूर्व सूचना न देता कामगारांना कामावरून कमी केले. त्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत रूजू करण्यात यावे, या मागणीसाठी बुधवारी सुवर्ण विधानसौधसमोर आंदोलन केले.
हुबळी वीज वितरण कंत्राटी कर्मचारी युनियनतर्फे आंदोलन करून राज्याच्या विद्युत विभागासमोर मागण्या मांडल्या. तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना कोणतेही कारण न देता अचानक नोकरीवरून कमी केले. अनेक वर्षांपासून हे कर्मचारी सेवा देत असताना कामावरून का कमी केले याचे उत्तर अद्यापही देले नाही. त्यामुळे पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली.