Tarun Bharat

‘अग्नीपथ’ लोकसभा निवडणूक जुमला

Advertisements

काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते व्हेरिएटो फ्ढर्नांडिस, संजय बर्डे यांची टीका

प्रतिनिधी /पणजी

केंदातील भाजप सरकारने जाहीर केलेल्या ‘अग्नीपथ’ या संरक्षण दलातील भरती योजनेवर काँग्रेस पक्षाने हल्लाबोल केला असून ती योजना म्हणजे ‘युवकांना वापरा, फ्ढकून द्या’ असे धोरण असल्याची टीका केली आहे. सदर योजना 17 ते 21 वर्षीय युवकांचे आयुष्य बरबाद करणारी असून ती लोकसभा निवडणूक जुमला असल्याचे पक्षाच्या प्रवक्त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

काँगेसचे प्रवक्ते व्हेरिएटो फ्ढर्नांडिस व संजय बर्डे यांनी पणजीत काँगेस भवनात  पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की 17 ते 21 हे वय मुलांच्या उच्च शिक्षणचे भवितव्याचे असून त्या वयात मुलांनी शिक्षण सोडून संरक्षण दलात भरती व्हावे आणि चार वर्षानंतर 75 टक्के मुलांना, युवकांना घरी पाठवणार आहेत. मग त्यांनी काय करावे ? अशी विचारना फ्ढर्नांडिस यांनी केली आहे.

भाजपचे आमदार नेतेमंडळी या योजनेचे गुणगान करतात. प्रत्यक्षात त्यांची किती मुले या संरक्षण दलात आहेत किंवा सदर योजनेत भरती होतील ते सांगावे असे आव्हान काँगेस पक्षातफ्xढ भाजपला देण्यात आले आहे.

Related Stories

धार्मिक स्थळ कायदा रद्द होण्यासाठी दबाव वाढवा

Amit Kulkarni

गोवा भूमिपुत्र अधिकारणी विधेयक मंजूर

Amit Kulkarni

कर्नाटकातील वाहनांना पोळे चेकनाक्यावरून प्रवेश देऊ नये

Omkar B

मास्कसंबंधी निष्काळजीपणा घातक ठरू शकतो

Patil_p

काणकोणातील किनाऱयांवर देशी पर्यटकांची गर्दी

Patil_p

भाजप आणि संदीप वझरकर यांना पाठिंबा देणे चुकीचे होते- सुकूर पंच सदस्य डितोसा लोबो

Amit Kulkarni
error: Content is protected !!