Tarun Bharat

दिल्लीत सायकल मार्केटमध्ये अग्नितांडव

सुदैवाने जीवितहानी टळली ः लाखोंचे नुकसान

@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था

दिल्लीमधील आगीच्या दुर्घटनांचे सत्र शुक्रवारीही सुरू राहिले. मध्य दिल्लीतील झंडेवालान सायकल मार्केटमधील एका गोडाऊनमध्ये शुक्रवारी दुपारी मोठी आग लागली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी 11 दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गोदामात आग लागल्याची माहिती दुपारी 2.05 वाजता अग्निशमन दलाला देण्यात आली. आग मोठी असल्याची खात्री झाल्यानंतर 27 गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आग विझवण्याचे प्रयत्न सायंकाळपर्यंत सुरू होते.

सायकल मार्केटमधील या घटनेपूर्वी गुरुवारी ईशान्य दिल्लीतील मुस्तफाबाद भागात इलेक्ट्रिक वस्तूंच्या कारखान्याला लागलेल्या आगीत एका 42 वषीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तसेच अन्य सहा जण जखमी झाले. तसेच 13 मे रोजी दिल्लीच्या मुंडका भागात एका व्यावसायिक इमारतीला लागलेल्या भीषण आगीत किमान 27 लोकांचा मृत्यू झाला होता.

Related Stories

काँग्रेस सत्तेवर आल्यास 500 रुपयांत सिंलिंडर

Patil_p

अयोध्येतील मशिदीला बाबरचे नाव नसणार

Patil_p

देशव्यापी लसीकरणाचे शनिवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उदघाटन

Patil_p

दागिन्यांसाठी जुगाड, मास्कवर घातली नथ

Patil_p

कोटकपूरा गोळीबार प्रकरणी प्रकाश सिंह बादल यांना जामीन

Amit Kulkarni

पुलवामातील हुतात्मा जवानांना राहुल गांधींची श्रद्धांजली

Patil_p