बवाना येथील कारखान्यात भीषण आग : 1 ठार, 7 जखमी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत आगीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. मुंडका, नरेला नंतर आता दिल्लीतील बवाना औद्योsगिक वसाहतीतील एका मॅन्युफॅक्चरिंग युनिटच्या पहिल्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी घडली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
बवाना औद्योगिक संकुलातील एका कारखान्यात इलेक्ट्रिक वस्तूंच्या चेसिसला आग लागली आहे. या आगीमध्ये अनेक इन्व्हर्टर, स्टॅबिलायझर, एफएम आदी वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहे. या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या 17 गाडय़ा आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. पोलीस आणि अग्निशमन विभागाचे अधिकारी या घटनेवर लक्ष ठेवून होते. मात्र, सायंकाळपर्यंत आगीवर पूर्ण नियंत्रण मिळविण्यात आले नव्हते.