Tarun Bharat

रिलायन्स ब्रँड्स-बॅलेन्सियागा यांच्यात करार

Advertisements

दोघेजण एकत्रित उत्पादने विकणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

रिलायन्स ब्रँड्स लिमिटेड (आरबीएल) यांनी देशांतर्गत बाजारात सुपर लक्झरी ब्रँड बॅलेन्सियागा याची उत्पादने विकण्यासाठी नुकताच करार केला आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की या दीर्घकालीन प्रँचायझी करारांतर्गत भारतातील बॅलेन्सियागाचा एकमेव भागीदार असल्याची माहिती आहे. 

बॅलेंसियागा या कंपनीची स्थापना पॅरिसमध्ये 1937 मध्ये स्पॅनिश वंशाच्या क्रिस्टोबल बोलान्सियागा यांनी केली होती. बॅलेन्सियागा हे फॅशन जगतात एक मोठे नाव आहे आणि ते आपल्या नवीन पिढीला आकर्षित कपडे आणि फॅशनमधील नवीन प्रयोग करणारे म्हणून ओळखले जातात.

आरबीएलचे व्यवस्थापकीय संचालक दर्शन मेहता म्हणाले, ‘जगातील काही ब्रँड्समध्ये बालान्सियागाचे नाव आग्रहाने घेतले जाते. तिने तिच्या उत्कृष्ट आणि साध्या आधुनिक पोशाखाने जगात एक विशेष स्थान प्राप्त केले आहे.’

Related Stories

स्विगीचे डिजिटल वॉलेट स्विगी मनी सादर

Patil_p

अँड्रॉईड, आयओएस मोबाईल धारकांना वापरता येईल गुगल मीट

Patil_p

स्टेट बँकच्या योनो ऍपवर मिळणार विशेष ऑफर

Patil_p

फसलेल्या पाककृती

Patil_p

सरकार एनएफएलमधील वाटा विकणार

Patil_p

प्रंटलाईन कामगारांसाठी इंडियन ऑईलचा पुढाकार

Amit Kulkarni
error: Content is protected !!