Tarun Bharat

लोकमान्य-आयएक्सजीमध्ये करार

Advertisements

प्रतिनिधी/ बेळगाव

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चेअरमन किरण ठाकुर यांनी त्यांच्या पुणे येथील नवी पेठ शाखेत झालेल्या IXG लॉजिस्टिकसह भागीदारी कराराची घोषणा केली. IXG लॉजिस्टिकचे एमडी विद्याधर पाटील आणि अध्यक्ष किरण ठाकुर यांनी वार्षिक कार्यक्रमादरम्यान भागीदारीवर स्वाक्षरी केली.

‘लोकमान्य’ समूहाने उत्कृष्ट अनुभव आणि स्थानिक SME साठी संधी निर्माण करून आणि त्यांच्या कार्याचा विस्तार करण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत. IXG Logistics सोबतचा हा करार परस्पर सहकार्याबरोबरच उत्कृष्ट ग्राहक सेवाही देईल, असा विश्वास यावेळी विद्याधर पाटील यांनी व्यक्त केला. IXG Logistics मधील आमचे मुख्य लक्ष कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा प्रदेशातील व्यक्ती आणि व्यवसायांना अतुलनीय शिपिंग अनुभव प्रदान करणे हा आहे. स्थानिक ते जागतिक पातळीवर सेवा विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करणे ही मोठी कल्पना आहे. आम्हाला बेळगाव ब्रँड जागतिक स्तरावर न्यायचा आहे, असेही ते म्हणाले.

त्यांनी पुढे स्पष्ट केले की, भारताला समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि परंपरा आहे, आणि लाखो भारतीय पश्चिमी देशांत राहतात. परंतु त्यांच्या मनामध्ये भारतीयत्व कायम असते. भारतीयांसाठी उत्सव प्रिय आहेत. भारतातून आलेल्या प्रत्येक गोष्टीचे त्यांना आकर्षण असते. दुकानात खरेदी केलेले असोत किंवा घरी हाताने बनविलेले असोत पारंपरिक कपडे, ऍक्सेसरीज इत्यादी खाद्यपदार्थांची श्रेणी  त्यांच्यापर्यंत पोहोचविणारी सेवा म्हणजे IXG होय.

 पश्चिमी देशांत राहणाऱया आमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना बेळगावमधून कुंदा निर्यात करण्याची संधी आम्हाला पहिल्यांदाच मिळाली आहे. त्यात आम्ही यशस्वी झालो आहोत, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले. आता हा आनंद भारतातील आणि भारताबाहेरील कुटुंबांपर्यंत पोहोचविण्याचा बहुमान लोकमान्य टीमसोबत मिळेल. या संधीसाठी दिवाळी हा सर्व ऋतूंमध्ये सर्वात मोठा आहे आणि मला विश्वास आहे की तुमचे आम्हाला उत्तम सहकार्य लाभेल.

समाधानाची भावना अनमोल आहे आणि असे समाधान सर्वांनाच मिळावे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. स्थानिक ते जागतिक असा आमचा प्रवास आहे. आता तो लोकमान्यसोबत करत असल्याचा आनंद वेगळा आहे. बेळगावचा ब्रॅन्ड असणारा कुंदा आयएक्सजीने अमेरिकेत यशस्वीपणे पोहोचविला आहे. आम्ही पुरोहित मिठाईसोबत भागीदारी केली आणि पहिल्यांदाच बेळगावमधून स्थानिक मिठाई व उत्पादने यशस्वीरीत्या वितरित केली, असे सांगून पाटील यांनी लोकमान्यशी नाते जोडल्याचे समाधान व्यक्त केले.  

Related Stories

हद्द निश्चितीनंतर कणबर्गी योजनेचे काम मार्गी

Omkar B

सिव्हिल हॉस्पिटलमधील ऑपरेशन थिएटर अद्यापही बंदच!

Patil_p

मंगसुळी कालव्याला पाणी आल्याने शेतकऱयांतून समाधान

Patil_p

अडीच हजारांहून अधिक स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह

Patil_p

भूमिगत कचराकुंडय़ांचे लवकरच लोकार्पण

Amit Kulkarni

किल्ले बनवा; फोटो पाठवा!

Patil_p
error: Content is protected !!