Tarun Bharat

Agri-Tourism Business: तुमच्याकडे स्वतःची जमीन आहे तर तुम्हीही सुरु करा कृषी पर्यटन केंद्र…

तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे? आणि तुमच्याकडे शेतीसुद्धा आहे… तर मग चिंता करू नका… मी तुम्हाला एक असा व्यवसाय सांगणार आहे जो तुम्ही ग्रामीण भागात अतिशय कमी गुंतवणुकीत सुरु करू शकता आणि महिन्याला लाखो रुपये कमाऊ शकता.

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

जर तुम्ही ग्रामीण भागात राहात असाल, शेतकरी असाल आणि तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर कृषी पर्यटन व्यवसाय सुरु करण्याची तुम्हाला नामी संधी आहे. पण अनेकांना हा व्यवसाय नेमका कसा सुरु करायचा, त्यासाठी किती इन्व्हेस्टमेंट लागेल, त्याची मार्केटिंग कशी करायची, त्यातून किती नफा मिळेल, हे प्रश्न तुमच्या डोक्यात असणार आहे. त्यामुळे या लेखामध्ये आपण कृषी पर्यटन विषयी माहिती घेऊ.

जर आपण कृषी पर्यटन या संकल्पनेचा विचार केला तर यामध्ये कृषी व पर्यटन या दोन भागांचा समन्वय हा दिसून येतो. या संकल्पनेमध्ये शेती पर्यटक शेतांना भेट देतील, शेतीचे विविध अंगे व पैलूचे दर्शन वा अनुभव घेतील, तसेच शहरी पर्यटक प्रदूषण मुक्त वातावरणाचा तसेच ताजा फळे व भाजीपाला खरेदी करू शकतील.
शहरी लोकांना ग्रामीण जीवनाची संस्कृतीची ओळख करून देण्याबरोबरच खेड्यातील शेतकरी वर्गाला उत्पन्न, रोजगार आणि आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याच्या व्यापक दृष्टिकोन त्यामागे आहे. शेती आणि पर्यटन या दोन संकल्पना जोडणारा दुवा म्हणजे कृषी पर्यटन केंद्र. शहरामध्ये घड्याळाच्या काट्याप्रमाणे धावणाऱ्या लोकांचा थोडे विरंगुळा व्हावा तसेच या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतील याच दृष्टिकोनातून कृषी पर्यटनाला खूप महत्व आहे.

कृषी पर्यटनाच्या व्यवसायातील संधी
स्थानिक हस्तकला, शेती उत्पादनावरील प्रक्रिया व त्याची विक्री, हरितगृह, दुग्ध व्यवसाय, मत्स्यव्यवसाय, रोपवाटिका, कुक्कुटपालन, शेळीपालन, मेंढीपालन, पशुपालन व्यवसाय, ग्रामीण फेरफटका, निसर्ग पर्यटन, साहसी पर्यटन आदी व्यवसाय करण्याची संधी आहे.

कृषी पर्यटनाचा शासनाकडून मिळणारे लाभ
कृषी पर्यटन केंद्रास पर्यटन विभागाकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळेल
कृषी पर्यटन केंद्र मालकास नोंदणी प्रमाणपत्राच्या आधारे बँक लोन प्राप्त करता येईल.
जलसंधारण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या पाणलोट आधारित योजना
शेततळे यासारख्या योजना करता कृषी पर्यटन केंद्रास प्राधान्य देण्यात येईल
नोंदणीकृत कृषी पर्यटन केंद्र राज्य व केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या ग्रीनहाऊस, फळबाग, भाजीपाला लागवड या सरकारी योजना उपलब्ध करून दिल्या जातील.

कृषी पर्यटन व्यवसायासाठी आवश्यक असलेले लायसेंन्स आणि रेजिस्ट्रेशन ( License & Registraion for Agri-tourism )
MTDC Registration ( Maharastra Tourism ) – कृषी पर्यटन केंद्र सुरु करण्यासाठी तुम्ही Directly MTDC किंवा महाराष्ट्र Tourism Department ला भेट देऊ शकता. तिथे तुम्हाला सर्व माहिती मिळेल.
Food License
GST Registration
Fire Safety Clearance Certificate
लोक निवास असल्यास बांधकाम परवानगी आवश्यक.
कृषी पर्यटन केंद्राच्या नोंदणीसाठी कोणते कागदपत्र लागतील ( Documents Required for Registraion of Agri-tourism Center )
अर्जदाराची जमिनीची कागदपत्रे ( ७/१२ उत्तरे, ८ अ )
आधार कार्ड/ पॅन कार्ड
Food License Certificate
वैयक्तिक शेतकरी वगळला इतरांसाठी विविध कायद्या अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र
वीज बिल
लोक निवास असल्यास बांधकाम परवानगी आवश्यक.
विविध कायद्या अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्थांमार्फत कृषी पर्यटन केंद्र करिता अर्ज करण्यास अधिकार प्राप्त झालेल्या व्यक्तीचे Authorization Letter
नोंदणी शुल्क २५००/- ऑनलाईन पद्धतीने gras.mahakosh.gov.in या वेबसाइट वर भरून चलनाची कॉपी सादर करणे.

कृषी पर्यटन केंद्रात काय सुविधा असेल….

तुम्ही एक Package बनवू शकता जस की पर व्यक्तीकडून २००० रुपये किंवा ३००० रुपये तुम्ही घेऊ शकता. आणि त्या Package मध्ये मी आधी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे Experiences आणि Activities तुम्ही Add करू शकता.

जसे गावाकडे शेती कशी करायची, स्थानिक भागातील फळांची आणि भाज्यांची माहिती, चुलीवरच जेवण, बैलगाडी ची सवारी, हुर्डापार्टी, शेणाच्या गौऱ्या बनवणे. ग्रामीण भागातील वेगवेगळे खेळ खेळणे यामध्ये तुम्ही अनेक गोष्टी add करू शकता. गावाकडे तुम्ही ज्या ज्या गोष्टी करतात त्यातील अनेक गोष्टी तुम्ही यात ऍड करू शकता.

तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे packages देखील बनवू शकता जसे पाहिलं Basic Package ज्याची Price आहे १५०० ते २००० per / person –
ज्यामध्ये One Day Tour आणि या पाच Activity , सोबत नाश्ता, दुपारचं जेवण.
दुसरं Package ज्याची Price २५०० ते ५००० per/person असेल
ज्यामध्ये २ दिवस आणि एक रात्र मुक्काम आणि या दहा activity सोबत जेवण, नाश्ता आणि इतर basic गोष्टी.
त्याचबरोबर तुम्ही Foreigner लोकांसाठी वेगळे Packages बनवू शकता ज्यामध्ये त्यांना अजून extra Activities देऊ शकता.
तुम्ही काही स्वस्तातली Packages सुद्धा देऊ शकता जेणेकरून जे लोक Price Conscious आहे त्यांना ते परवडतील.
किंवा अजून काही Extra Activities Add करून तुम्ही जास्त किमतीचे Packages देखील बनवू शकता.
जर कोणी पूर्ण च्या पूर्ण Family येणार असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही Family Packages देखील बनवू शकता. अश्या अनेक गोष्टी तुम्ही करू शकता.

कृषी पर्यटन ही एक उभरती संकल्पना असून, कृषी पर्यटनामुळे अर्थकारणावर सकारात्मक परिणाम होत आहे. शेती आणि पर्यटनाच्या संगमातून केवळ रोजगार संधीच निर्माण होत नाहीत तर ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासाला चालना मिळते कृषी पर्यटनाला चालना देताना या क्षेत्रातील घटकांचे, विशेषत: महिलाच्या कौशल्य विकास, प्रशिक्षण करण्यावर भर देण्याचे शासनाचे धोरण आहे. येत्या काळात कृषी पर्यटनाला चालना देण्याचा निर्धार 2021 च्या चौदाव्या जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये करण्यात आला असुन तो कृषी पर्यटनाला नक्कीच उभारी देणारा ठरणार आहे.

महाराष्ट्र राज्याने कृषी पर्यटन धोरण जाहीर करुन राज्याने या क्षेत्रात आघाडी घेतली. आपला देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, त्यामुळे कृषी पर्यटनाला देशात व राज्यात मोठा संधी आहे. इटली, स्पेनसह विविध युरोपीयन देश, अमेरीका आदी ठिकाणी कृषी पर्यटनात विविध प्रयोग केले जात आहेत. गावाचे गावपण, संस्कृती, विचार परंपरा, उत्सव, खाद्यपदार्थ हे ग्रामीण पर्यटनाचे घटक बनले असून निस्वार्थी शेतकरी स्थयीभाव, आदर आतिथ्याची जोड, शिक्षण व तंत्रज्ञानाची साथ, यामुळे महिलाचा सहभाग ग्रामीण पर्यटनाला मोठा वाव आहे. कोरोनोत्तर काळात या क्षेत्राला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात अली आहे. यामुळे कृषी पर्यटन हे पर्यटन विकासात शाश्वत योगदान देणारे पर्यटन म्हणून पर्यटकांच्या पसंतीस उतरले आहे.

Related Stories

पावसाळ्यात जोडीदारासोबत फिरायचा प्लॅन करताय…. तर मग नक्की वाचा

Abhijeet Shinde

कुमाऊंला आलात तर या पारंपारिक चवींचा आस्वाद नक्की घ्या..

Kalyani Amanagi

अशी ही आगळीवेगळी ठिकाणं

tarunbharat

ओडिशाची ही स्वादिष्ट डिश आपण चाखली आहे काय…

Kalyani Amanagi

नेपाळला जाण्याचा विचार करतायं? असे तयार करा प्रवासाचे बजेट

Abhijeet Khandekar

TRAVEL BLOG: वन डे ट्रिप करायचीय ; ‘या’ ठिकाणाला नक्की भेट द्या…

Abhijeet Shinde
error: Content is protected !!