Tarun Bharat

कृषी खात्याचा अधिकारी एसीबीच्या जाळय़ात

20 हजार रुपयांची लाच घेताना कारवाई

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

अनगोळ येथील एका बेरोजगार युवकाकडून 20 हजार रुपयांची लाच घेताना कृषी खात्याच्या अधिकाऱयाला रंगेहाथ पकडले आहे. बुधवारी एसीबीच्या अधिकाऱयांनी ही कारवाई केली. या कारवाईनंतर घर व कार्यालयात केलेल्या तपासणीत 3 लाख 98 हजार रुपये जप्त केले आहेत.

एसीबीचे पोलीस अधीक्षक बी. एस. नेमगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक जे. एम. करुणाकर शेट्टी, पोलीस निरीक्षक ए. एस. गुदीगोप्प, निरंजन पाटील व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली. एसीबीच्या कारवाईने सरकारी अधिकाऱयांत खळबळ माजली आहे.

बाबले गल्ली, अनगोळ येथील मोनेश्वर आण्णाप्पा कम्मार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कृषी खात्याच्या सहसंचालक कार्यालयातील अधिकारी योगेश फकिरेश अगडी यांना 20 हजार रुपयांची लाच घेताना अटक झाली आहे. एसीबीने एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

मोनेश्वर हे बेरोजगार आहेत. त्यांनी सिटी कंपोस्ट मार्केटिंग (स्टेट मार्केटर्स लायसेन्स)साठी ऑनलाईन अर्ज दाखल केला होता. या अर्जाची पडताळणी करून अहवाल देण्यासाठी कृषी खात्याचे योगेश अडगी यांनी 30 हजार रुपये मागितले होते. 10 हजार रुपये आधीच स्वीकारले होते. उर्वरित 20 हजार रुपये घेताना बुधवारी त्यांना अटक झाली. त्यानंतर एसीबीच्या अधिकाऱयांनी त्यांच्या कार्यालयात 44 हजार व घरात 3 लाख 54 हजार असे 3 लाख 98 हजार रुपये जप्त केले आहेत.

Related Stories

कोरोनामुळे सरकारी योजनांना ब्रेक

Patil_p

कर्नाटकः कोरोना प्रसार कमी करण्यासाठी ८ उत्पादने बाजारात

Abhijeet Shinde

देश महासत्ता बनण्यासाठी शिक्षण अत्यावश्यक

Patil_p

विणकर कामगारांनाही विशेष पॅकेज जाहीर करा

Patil_p

बेंगळूर हिंसाचारात एसडीपीआयचा सहभाग : मंत्री आर. अशोक

Abhijeet Shinde

मजगावात महिलेची गळफासाने आत्महत्या

Omkar B
error: Content is protected !!