Tarun Bharat

अण्णाद्रमुकचे प्रमुखपद पलानीसामींकडे?

पन्नीरसेल्वम यांचा मात्र विरोध : पक्षात गटबाजीला ऊत

वृत्तसंस्था /चेन्नई

Advertisements

तामिळनाडूतील मुख्य विरोधी पक्ष अण्णाद्रमुक एका अंतर्गत सत्तासंघर्षाला सामोरा जात आहे. पक्षात सिंगल लिडरशिपच्या आवाहनासोबत हा संघर्ष आता जाहीरपणे समोर आला आहे. मागील आठवडय़ात प्रमुख पदाधिकाऱयांच्या एका बैठकीनंतर पक्षासाठी ‘एक नेतृत्वा’ची मागणी करणारे काही सूर उमटू लागले आहेत. तेव्हापासूनच पक्षातील कलह आता सर्वांसमोर आला आहे. एकाचेच नेतृत्व अशी मागणी प्रथम माजी मुख्यमंत्री के. पलानिसामी यांच्या निकटवर्तीयांनी केली होती आणि तेव्हापासून ओ. पन्नीरसेल्वम यांच्या समर्थकांनी सामूहिक नेतृत्वासाठी पोस्टर लावले आहे.

ओ. पन्नीरसेल्वम यांना दिवंगत अण्णाद्रमुक प्रमुख जे. जयललिता यांनी नेता म्हणून निवडले होते असा दावा त्यांचे समर्थक करत आहेत. परंतु तरीही आकडेवारी ओ. पन्नीरसेल्वम यांच्या विरोधात आहे. तसेही पन्नीरसेल्वम यांच्यासाठी बंड काही नवी बाब नाही. फेब्रुवारी 2017 मध्ये व्ही.के. शशिकला यांच्या कुटुंबाकडे पक्षाची सूत्रे गेल्यावर पन्नीरसेल्वम यांनी विरोधाची भूमिका घेतली होती.

परंतु आता पन्नीरसेल्वम यांना साथ देणारे नेते फारच कमी राहिले आहेत. त्यांच्या अनेक निकटवर्तीयांनी पलानिसामी यांची भेट घेत त्यांच्या नेतृत्वाला समर्थन दिले आहे. खासदार आणि तळागाळातील समर्थकांची संख्या कमी झाल्याने पन्नीरसेल्वम यांनी गुरुवारी एक महत्त्वपूर्ण बैठक रोखण्यासाठी कायदेशीर मार्ग अवलंबिला. या बैठकीत पलानिसामी यांची पक्षाचा सर्वोच्च नेता म्हणून निवड होण्याची शक्यता होती. परंतु मद्रास उच्च न्यायालयाने बैठक रोखण्यास नकार दिला. तरीही पन्नीरसेल्वम यांना दिलासा देत उच्च न्यायालयाने बैठक गुरुवारी होऊ शकत असली तरीही 23 मसुदा प्रस्तावच संमत केले जाऊ शकतात असे म्हटले आहे. अन्य प्रस्तावांवर (एकमेव नेतृत्व) चर्चा करता येणार असली तरही तो संमत केला जाऊ शकत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

पन्नीरसेल्वम यांचे बळ घटतेय हे आता स्पष्ट झाले आहे. राज्यात भाजप एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून उदयास येत असल्याने अण्णाद्रमुकमध्ये एकमेव नेतृत्वाचा मुद्दा जोर पकडत असल्याचे मानले जात आहे. विरोधी पक्ष म्हणून अन्य पक्षाचा उदय होणे अण्णाद्रमुकसाठी धोक्याचे आहे. तसेही ओ. पन्नीरसेल्वम आणि ई. पलानिसामी यांच्यात मागील काही काळापासून पक्षाच्या नेतृत्वावरून चढाओढ सुरू आहे. तर व्ही.के. शशिकला यांनी आपणच अण्णाद्रमुकच्या खऱया उत्तराधिकारी आहोत असा दावा केला आहे.

गुरुवारच्या बैठकीत अण्णाद्रमुकचे समन्वयक आणि माजी उपमुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांच्यावर बाटल्या फेकण्यात आल्या. गोंधळ वाढल्याचे पाहून ते बैठकीतून निघून गेले. पक्षाच्या साधारण परिषदेची पुढील बैठक 11 जुलै रोजी होणार असल्याची घोषणा करण्यात आली.

Related Stories

वेलनेस फॉरेवर यांचा येणार आयपीओ

Patil_p

22 वर्षांनी कुटुंबाशी मिलन

Patil_p

यूपी : पंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

datta jadhav

दागिन्यांसाठी जुगाड, मास्कवर घातली नथ

Patil_p

आक्षेपार्ह घोषणांसाठी मुलाला मिळाले होते प्रशिक्षण

Patil_p

दहशतवाद्यांना सुरक्षित पोहचविण्यासाठी मिळाले 12 लाख

prashant_c
error: Content is protected !!