Tarun Bharat

डॉ. सुनीलकुमार लवटे सत्कार समितीची सामाजिक बांधिलकी

बालकल्याण संकुलला दिली लाख मोलाची मदत

प्रतिनिधी/कोल्हापूर

ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या नागरी सत्कार समितीच्या वतीने बालकल्याण संकुलला एक लाख तर पंढरपूर येथील वा. बा. नवरंगे बालकाश्रमास 67 हजाराचा धनादेश देण्यात आला. दरम्यान, या कार्यक्रमाच्या निमित्ताने तब्बल बावीस वर्षांनंतर बालकल्याण संकुलमध्ये डॉ. लवटे यांनी पाऊल ठेवले आणि कार्यक्रमाला भावनिकतेची किनार मिळाली.

डॉ. लवटे यांचा ऑक्टोबर महिन्यात कोल्हापुरात नागरी सत्कार करण्यात आला. यासाठी समाजातील अनेकांनी निधी दिला होता. कार्यक्रमासाठी यातील काही रक्कम खर्च झाली. उर्वरित रक्कम सामाजिक संस्थांना देण्याचा निर्णय सत्कार समितीच्या वतीने घेण्यात आला. त्यानुसार जेथे डॉ. लवटे यांचे बालपण गेले, ते नवरंगे हायस्कूल तसेच जेथे ते घडले त्या बालकल्याण संकुलास हा निधी देण्यात आला. बालकल्याण संकुल येथे झालेल्या कार्यक्रमात निधी प्रदान करण्यात आला. यावेळी संकुलचे उपाध्यक्ष व्ही. बी. पाटील, मानद कार्यवाह पद्मा तिवले, नवरंगे बालकाश्रमाच्या अधीक्षिका राजश्री गाडे यांनी हा निधी स्वीकारला. यावेळी सत्कार समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जी. पी. माळी, सचिव विश्वास सुतार, खजिनदार प्रभाकर हेरवाडे, पी. डी. देशपांडे, अनिल म्हमाने, सागर बगाडे आदि उपस्थित होते.

यापुढचे आयुष्य अनाथांसाठी खर्ची घालणार – डॉ. लवटे
दरम्यान, बालकल्याण संकुलच्या जडणघडणीत डॉ. लवटे यांचा मोलाचा वाटा होता, पण काही कारणाने ते गेली बावीस वर्षे या संस्थेपासून ते दूर होते. पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्ही. बी. पाटील यांच्या विनंतीला मान देऊन ते संस्थेत आले. संस्थेच्या सर्व शाखेत फिरून चौकशी केली. तेथे असलेल्या मुलांत ते रमले. यापुढचे आयुष्य अनाथांसाठी खर्ची घालण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Related Stories

कालकुंद्रीतील तरुणाची गळफासाने आत्महत्या

Abhijeet Khandekar

ट्रूनॅट मशीनव्दारे होणार कोरोना विषाणूची चाचणी ; महापालिकेच्या चाचणी केंद्रास मंजुरी

Archana Banage

कोल्हापुरात आज आणखी पाच पॉझिटिव्ह रुग्ण

Archana Banage

वारणा सह. साखर कारखान्याच्या अध्यक्षा शोभाताई कोरे यांचे निधन

Archana Banage

सोलापूर : कुर्डुवाडीत भूकंपाचे हादरे? नागरिक संभ्रमात

Archana Banage

चेतना-स्वयंम संस्थेच्या दिवाळी साहित्याला पसंती

Archana Banage