Tarun Bharat

80 हजार तिरंगा फडकविण्याचे उद्दिष्ट

Advertisements

‘हर घर तिरंगा’साठी 56 हजार ध्वजांची वाढ : ध्वजांच्या तुटवडय़ाने अधिकाऱयांची तारांबळ

प्रतिनिधी /बेळगाव

आपला देश स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम राबविण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, तालुक्मयातील प्रत्येक घरावर ध्वज फडकविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र सरकारकडून देण्यात आलेले उद्दिष्ट यापूर्वी 24 हजार ध्वजांचे होते तर आता शुक्रवारी यात वाढ करून 80 हजार ध्वज फडकविण्याचे उद्दिष्ट देण्यात आल्याने अधिकाऱयांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. दरम्यान तालुका पंचायतमध्ये ध्वज घेण्यासाठी ग्राम पंचायतीचे पीडीओ, सेपेटरी आणि कर्मचाऱयांची गर्दी झाली होती. ध्वजांचा तुटवडा असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.

बेळगाव तालुक्मयात 90 हजारांहून अधिक घरे असल्याचा अंदाज आहे. यामधील केवळ 24 हजार घरांवर तिरंगा फडकविण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र तालुका पंचायतच्या अधिकाऱयांनी 24 ऐवजी 30 हजार तिरंगा ध्वज फडकविण्यासाठी प्रयत्न केले. हे टार्गेट पूर्ण होताच पुन्हा वरि÷ अधिकाऱयांकडून शुक्रवारी सकाळी 80 हजार तिरंगा फडकविण्याचे उद्दिष्ट देण्यात आल्याने अधिकाऱयांची धावपळ सुरू झाली आहे. अचानक हा निर्णय घेतल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. एक तर ध्वज तयार नाहीत, त्यातच हे उद्दिष्ट देण्यात आल्याने आता करायचे तरी काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त केंद्र सरकारने घोषित केलेले ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात येत आहेत. दि. 13 ते 15 ऑगस्ट असे तीन दिवस तिरंगा फडकवायचा आहे. त्यामुळे तालुका पंचायतमध्ये शुक्रवारी सकाळी पीडीओंची बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन करण्यात आले.

स्वसाहाय्य संघांकडून शिलाई

स्वसाहाय्य संघांकडून ध्वज शिलाईचे काम करण्यात येत आहे. मात्र मागील दिलेल्या उद्दिष्टापेक्षा तातडीने पुन्हा 56 हजार ध्वज कसे शिलाई करायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रत्येक घरावर ध्वज फडकविण्याचे आदेश देण्यात आले. मात्र त्याचे योग्य नियोजन नसल्याने समस्या निर्माण झाली आहे.

तालुका पंचायतच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी राजेश दनवाडकर यांनी आता केवळ एकच दिवस असून शनिवारपासून प्रत्येक घरावर ध्वज फडकविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तेव्हा आळस झटकून कामाला लागा, असे आवाहन त्यांनी पीडीओंना केले.

Related Stories

बेळगाव तालुक्यात कोरोनाचे दोन नवे रुग्ण

Patil_p

हुबळी विभागीय रेल्वेला मालवाहतुकीतून मोठे उत्पन्न

Amit Kulkarni

सोशल मीडियावर पोलिसांची नजर

Patil_p

विवाह सोहळय़ावेळी दिला कर्तव्य निधी

Patil_p

परीक्षा घोटाळाप्रकरणी 9 जणांना अटक

Amit Kulkarni

जिल्हय़ात 6 हजार हेक्टरात हळद लागवड

Omkar B
error: Content is protected !!