Tarun Bharat

जमालपूर खडियामध्ये काँग्रेसला एआयएमआयएमचे आव्हान

मुस्लीमबहुल मतदारसंघ

अहमदाबाद शहरातील मुस्लीमबहुल जमालपूर खडिया मतदारसंघात असदुद्दीन ओवैसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनने (एआयएमआयएम) उमेदवार उभा केल्याने निवडणूक रंगतदार ठरली आहे. काँग्रेसचे माजी आमदार आता एआयएमआयएमचे उमेदवार म्हणून उभे राहिले आहेत.  या मतदारसंघात 5 म्हणजेच सोमवारी मतदान होणार आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार सबीर काबलीवाला यांनी 2012 च्या निवडणुकीत पक्ष उमेदवार समीर खान विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती, यामुळे भाजपचे  उमेदवार भूषण भट्ट विजयी झाले होते.

2017 च्या निवडणुकीत काँग्रेसचे इम्रान खेडावाला यांनी 75,346 मते प्राप्त करत विजय मिळविला होता. भाजपचे भट्ट हे 46,000 मतांसह दुसऱया स्थानावर राहिले होते. त्यावेळी काबलीवाला यांनी निवडणूक लढविली नव्हती. परंतु यावेळी काबलीवाला हे एमआयएमआयएमचे उमेदवार आहेत.

एआयएमआयएम अन् आम आदमी पक्ष हे भाजपची बी टीम आहेत. काबलीवाला यांनी 2012 मध्ये भाजपला विजय मिळवून देण्यास मदत केल्याचे जनता ओळखून आहे. यावेळीही काबलीवाला यांची पुनरावृत्ती करू पाहत असल्याचा दावा काँग्रेस उमेदवार आणि विद्यमान आमदार खेडावाला यांनी केला आहे. मुस्लीम मतांची विभागणी झाल्यास काँग्रेसला फटका बसणार आहे. खेडावाला (काँग्रेस) आणि काबलीवाला (एआयएमआयएम) हे दोघेही छीपा मुस्लीम समुदायाचे आहेत. या मतदारसंघात या समुदायाचे मतदार मोठय़ा संख्येत आहेत. तर गुजरातमध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढविणाऱया एआयएमआयएमला या मतदारसंघात विजयाची अपेक्षा आहे. परंतु मुस्लीम मते विभागणारा पक्ष अशी होणारी टीका एआयएमआयएमला तापदायक ठरू शकते. जमालपूर खडिया मतदारसंघात 65 टक्के मतदार मुस्लीम आहेत. याचमुळे या मतदारसंघावर एआयएमआयएमने लक्ष केंद्रीत केले आहे. तर भाजपने भूषण भट्ट यांना पुन्हा मैदानात उतरविले आहे

Related Stories

म्यानमारचे 30 हजार शरणार्थी मिझोरममध्ये

Patil_p

सर्वात भीतीदायक घरांपैकी एक

Patil_p

कोलकाता पोलिसांकडून नुपूर शर्माला ‘लुकआउट’

Patil_p

पदोन्नतीतील आरक्षण रद्दचा निर्णय मागे ; ठाकरे सरकारचा निर्णय

Archana Banage

‘त्या’ वक्तव्यावरुन नसीरुद्दीन शाह यांनी योगी आदित्यनाथना फटकारलं

Archana Banage

कॅबमध्ये विसरले 1 कोटीचे दागिने

Patil_p