रत्नागिरीतील आनंदनगर, गावखडीत दोन बंगले फोडले
प्रतिनिधी/ रत्नागिरी
ऐन गणेशोत्सवात रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागात चोरटय़ांनी धुमाकूळ घातला आह़े रविवारी रात्री चोरटय़ांनी शहरातील आनंदनगर भागातील डॉक्टरचा बंगला व गावखडी ब्राह्मणवाडी येथील बंगल्याला चोरटय़ांनी लक्ष केल़े दोन्ही ठिकाणाहून हजारो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची नोंद रत्नागिरी शहर व पूर्णगड पोलीस ठाण्यात करण्यात आली आह़े
शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील कर्लेकरवाडी आनंदनगर येथे वास्तव्यास असणारे डॉ. मिलिंद कुळकर्णी हे शनिवारी सायंकाळी गणेशोत्सवासाठी धामणसे येथे कुटुंबियांसमवेत गेले होते. सोमवारी सकाळी ते रत्नागिरीत दाखल झाले. यावेळी बंगल्यामध्ये चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आल़े गावी जाताना डॉ. कुळकर्णी यांनी आपला बंगला व्यवस्थित बंद केला होता. सोमवारी सकाळी घरात प्रवेश केल्यानंतर मुख्य प्रवेशद्वारानजीक असलेली स्लायडिंगची खिडकी उचकटलेली त्यांना दिसून आल़ी
चोरटय़ांनी खिडकीमार्गे बंगल्यात प्रवेश करून पहिल्या मजल्यावर असलेली दोन कपाटे फोडल्याचे दिसून आल़े कपाटामधील 27 हजार रुपयांची रोकड, चांदीचा तांब्या, सोन्याची अंगठी व कानातला जोड असा एकूण 37 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरटय़ांनी चोरून नेल़ा या प्रकारानंतर शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी घटनास्थळाला भेट दिल़ी तसेच श्वानपथकाला देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आल़े श्वानाला संशयित वस्तूंचा वास देऊन श्वान चोरटय़ांचा माग काढत विश्वनगरपर्यंत धावत गेले व त्याच ठिकाणी घुटमळले.
सोन्याची मूर्ती ठेवली
चोरी करताना चोरटय़ांनी बंगल्यात सर्व भागात शोधाशोध केल़ी यामध्ये देव्हाऱयामध्ये देखील चोरटे शिरले होत़े देव्हाऱयात सोन्यासह चांदीच्या मूर्ती होत्या. मात्र, त्या मूर्तींना त्यांनी हात लावला नाही. बंगल्याच्या मागील भागाला लोखंडी दरवाजा होता. त्या दरवाजाला देखील कुलूप लावलेले होते. या बंगल्यातून पळ काढताना चोरटय़ांनी दरवाजाचे कुलूप फोडले आणि मागच्या दरवाजाने ते पसार झाले. कुलूप फोडण्यासाठी त्यांनी कटावणीचा वापर केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
फॉरेन्सिक लॅबचे पथक दाखल
घरफोडी झाल्यानंतर ठसे मिळविण्यासाठी फॉरेन्सिक लॅबची मदत घेण्यात आली. फॉरेन्सिक लॅबचे एक पथक डॉ. मिलींद कुळकर्णी यांच्या घरी दाखल झाले. संपूर्ण बंगल्याची पाहणी करून या पथकाला चोरटय़ांचे ठसे मिळविण्यात यश आले आहे.
दरम्यान, या प्रकरणी डॉ. मिलींद कुळकर्णी यांनी शहर पोलिस स्थानकात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास शहर पोलिस करीत आहेत.
पूर्णगडमध्ये बंगला फोडला
पूर्णगड पोलिस स्थानकाच्या हद्दीत देखील घरफोडीचा प्रकार घडला आहे. एक बंद बंगला फोडून अज्ञात चोरटय़ांनी बंगल्यातून रोकड लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. एकाचवेळी रत्नागिरीत तालुक्यात दोन बंगले फोडल्याने पोलिसांनी देखील चोरटय़ांचा माग काढण्यासाठी कंबर कसली आहे.