चिनी कंपनीकडून निर्मिती
दुबईच्या आकाशात उडणाऱया कारचा अनुभव लोकांनी घेला आहे. अनेक लोकांना या उडणाऱया टॅक्सीला पाहून स्वतःच्या डोळय़ांवर विश्वासच बसला नाही. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर या एअर कारच्या परीक्षणाचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.
चिनी कंपनी एक्सपेंगने या एअर कारचे परीक्षण केले आहे. या कंपनीने स्वतःच्या एक्स2 फ्लाइंग कारच्या पहिल्या उड्डाणाद्वारे सर्वांना थक्क केले आहे. ऑटोमोबाइल क्षेत्रात ही मोठी कामगिरी असल्याचे अनेक जणांचे मानणे आहे. कंपनीने हे परीक्षण दुबईत केले आहे.
उड्डाण करण्यापूर्वी या कारमध्ये अनेक लोकांना बसविण्यात आले होते. दुबईत या फ्लाइंग कारने स्वतःचे परीक्षण यशस्वीपणे पूर्ण केले असून सर्व प्रवाशांना सुखरुप प्रवास घडवून आणण्यास यश मिळविले आहे. या यशस्वी परीक्षणानंतर कार प्रत्यक्ष सेवेत दाखल होण्यासाठी अजून काही कालावधी लागणार आहे. 130 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने धावणारी ही एअर कार पुढील काही वर्षांमध्ये प्रवासी वाहतुकीसाठी सज्ज होणार आहे.
या कारमध्ये दोन सीट्स असून यात इंटेलिजेन्स फ्लाइट कंट्रोल सिस्टीम, ऑटोनॉमस फ्लाइट कॅपेबिलिटी, झिरो कार्बन एमिशन्स यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत. लोक आगामी काळात या कारमुळे वाहतुकीच्या कोंडीच्या समस्येपासून मुक्त होऊ शकतात.