Tarun Bharat

आसाममध्ये अतिवृष्टीनंतर हवाई दलाकडून मोठ्या प्रमाणावर बचाव मोहीम

दिल्ली प्रतिनिधी :
भारतीय हवाई दलाने रविवारी आसाममधील पूरग्रस्त भागात मोठ्या प्रमाणावर मदत आणि बचाव कार्य सुरू ठेवले. हवाई दलाने लोकांना मदत साहित्य पुरवले. रेल्वे स्थानकावर अडकलेल्या ११९ प्रवाशांची सुटका करण्यासाठी भारतीय हवाई दलाने शनिवारी एक AN-32 वाहतूक विमान, दोन Mi-17 हेलिकॉप्टर, एक चिनूक हेलिकॉप्टर आणि एक ALH ध्रुव तैनात केले.


भारतीय वायुसेनेने पूरग्रस्त भागातील नागरिकांपर्यंत मदत सामग्री आणि लोकांना विमानाने पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या कामासाठी IAF ने आपली वाहतूक विमाने आणि हेलिकॉप्टर तैनात केले आहेत. आसाममधील पूरग्रस्त भागात एनडीआरएफचे २० जवान तैनात करण्यात आले आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य सरकार संयुक्तपणे मदत आणि बचाव कार्य करत आहेत.

Advertisements

भारतीय लष्कर, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) आणि NDRF यांनी स्वयंसेवकांच्या मदतीने पुरात अडकलेल्या एकूण 24,749 लोकांची सुटका केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पुराच्या पहिल्या टप्प्यात 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील 100,732.43 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे.

Related Stories

मणिपूरमधील सर्व जागा लढविणार भाजप

Patil_p

छत्रपतींचा शिवसेनेकडून अपमान, महाराष्ट्राला उत्तर द्या-प्रवीण दरेकर

Abhijeet Shinde

देशात 9985 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

शरद पवारांना राष्ट्रपती करण्याचा राऊतांनी बांधला चंग

prashant_c

35 किलोमीटरपर्यंत उलट धावली रेल्वे

Amit Kulkarni

वडिलोपार्जित मालमत्तेत मुलींना समान वाटा

Patil_p
error: Content is protected !!