Tarun Bharat

एअरटेल पेमेंट्स बँक 1.5 लाख मायक्रो एटीएम उभारणार

Advertisements

चालू आर्थिक वर्षात योजना राबविणार  

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

एअरटेल पेमेंट्स बँकेने आपल्या ग्राहकांना रोख पैसे काढण्याची सुविधा देण्यासाठी टियर 2 शहरे आणि निम-शहरी भागात 1.5 लाख मायक्रो एटीएम स्थापन करण्यास सुरुवात केली आहे. सदरची माहिती कंपनीने नुकतीच दिली आहे.

टप्प्याटप्प्याने होणार सुरुवात

टप्प्याटप्प्याने अधिक बँकिंग क्षेत्रे समाविष्ट करण्यासाठी बँक हळूहळू आपल्या सेवांचा विस्तार करेल. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे, की बँक सुरुवातीला टियर-2 शहरे आणि निम-शहरी भागात दीड लाख युनिट्स उभारणार आहे. या भागात सामान्यतः पैसे काढण्याच्या सेवेसाठी जास्त मागणी असते परंतु एटीएममध्ये मर्यादित प्रवेश असतो.

या उपक्रमाद्वारे वापरकर्त्यांना सहज रोख पैसे काढण्याची सुविधा देण्यासाठी बँक भारतभरातील पाच लाखांहून अधिक बँकिंग पॉइंट्सच्या मजबूत नेटवर्कचा लाभ घेईल असेही त्यात म्हटले आहे. 

मायक्रो एटीएम व्यवहार सुलभ करण्यासाठी एअरटेल पेमेंट्स बँकेने आता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) च्या नॅशनल फायनान्शियल स्विच (एनएफएस) सह एकत्रित काम केले आहे. बँकेने म्हटले आहे की, बँकिंग सेवा सर्वांसाठी सुलभ करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असणार आहोत.

Related Stories

कोरोना रुग्णांसाठी आरोग्य विमा दाव्यांच्या नियमात बदल हवा

Omkar B

एल ऍण्ड टी नुकसानीत

Patil_p

पेटीएम मनीचे पुण्यात इनोव्हेशन केंद्र

Patil_p

गुगलची कार्यालये जुलैमध्ये सुरू

Patil_p

इन्फोसिस, बँकांच्या कामगिरीमुळे सेन्सेक्स मजबूत

Patil_p

ब्रिटन देणार ‘हुवाई’ला टक्कर

Patil_p
error: Content is protected !!