आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीमधील स्थिती
नवी दिल्ली :
दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज एअरटेलच्या 5 जी ग्राहकांची संख्या आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीच्या (एप्रिल-जून) अखेरीस नऊ कोटीपर्यंत वाढली आहे. एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक गोपाल विठ्ठल यांनी कंपनीच्या तिमाही निकालानंतर विश्लेषकांशी झालेल्या बैठकीत ही माहिती दिली. दरम्यान, प्रतिस्पर्धी रिलायन्स जिओने जाहीर केले आहे की जूनच्या अखेरीस त्यांच्या ग्राहकांची संख्या 13 कोटी झाली आहे.
विठ्ठल यांनी विश्लेषकांना सांगितले की, 5 जी ग्राहकांची संख्या सतत वाढत आहे. आम्ही बाजारातील वाटा सतत वाढवत आहोत. ते म्हणाले की, या तिमाहीत एअरटेलच्या प्रति वापरकर्त्याच्या सरासरी महसुलात वाढ झाली आहे.