दुसऱयाच्या चुकीचे खापर घेतो स्वतःवर
चूक छोटी असो किंवा मोठी कुणीही त्याची जबाबदारी घेऊ इच्छित नाही. शक्यतो लोक स्वतःच्या चुकीचे खापर इतरांच्या माथी मारत असतात. परंतु एक असा व्यक्ती आहे, जो दुसऱयांच्या चुकीची जबाबदारी स्वतः घेत आहे. या व्यक्तीच्या दुसऱयांच्या चुकीची जबाबदारी स्वतः उचलण्याची सवय आहे, परंतु हे काम तो मोफत करत असून यासाठी लोकांकडून पैसे आकारत आहे.
स्पॅनिश अधिकाऱयांनी एका अशा व्यक्तीला शोधून काढले आहे, ज्याने आतापर्यंत शेकडो लोकांच्या ड्रायव्हिंगमधील चुकांची जबाबदारी स्वतः घेतली आहे. बालेअरिक आइसलँडच्या सिव्हिल गार्डने यासंबंधीच माहिती दिली आहे. संबंधित व्यक्ती हे कृत्य करण्यासह अत्यंत रंजक पद्धतीने स्वतःच्या सेवेची जाहिरातही करत आहे.
अधिकाऱयांनी या व्यक्तीचे नाव सांगितले नसले तरीही तो आर्मेनियन असल्याचे आणि त्याने आतापर्यंत अनेक जणांच्या ड्रायव्हिंग ऑफेन्सचे खापर स्वतःवर घेतल्याचे म्हटले आहे. लोक या व्यक्तीकडून अशाप्रकारची सेवा प्राप्त करतात, त्यांना स्वतःचे ड्रायव्हिंग रेकॉर्ड क्लीन ठेवायचे असते. या व्यक्तीला या सेवेच्या बदल्यात 75-200 युरो म्हणजेच 6 ते 15 हजार रुपयांचे शुल्क देण्यात येते. सिव्हिल ट्रफिक गार्डनुसार हे काम त्याने 2021 मध्ये सुरू केले. प्रत्येक ठिकाणी हा व्यक्ती ड्रायव्हिंग ऑफेन्सदरम्यान असे वाहन घेऊन यायचा, ज्याची नोंदणी देखील त्याच्या नावावर नसायची.
स्वतःचे लायसन्स निलंबित
शासकीय नोंदीनुसार त्याने अर्ध्या तासाच्या आता 800 किलोमीटर अंतरावर 2 वेळा ट्रफिक नियमांचे उल्लंघन केले, तर तपास करण्यात आला असता वाहन महिलेच्या नावावर असल्याचे आढळून आले. परंतु दंडाची पावती या व्यक्तीने स्वतःच्या नावावर करविली होती. या व्यक्तीचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द झालेले आहे. आतार्पंत स्पेनमध्ये एकूण 91 लोकांच्या ड्रायव्हिंग ऑफेन्सची जबाबदारी घेत या व्यक्तीने लाखो रुपये कमाविले आहेत. स्पेनमध्ये ट्रफिक नियमांच्या उल्लंघनाची शिक्षा पॉइंट्सने ठरत असल्याने लोक स्वतःचे पॉइंट वाचविण्यासाठी त्याची सेवा घेत असतात.