Tarun Bharat

अजित पवारांवर शरद पवार विश्वास ठेवत नाहीत- अजयकुमार मिश्रा

अजित पवारांवर त्यांच्या काकांचाही विश्वास नाही.शरद पवार पक्षातील दुसऱ्याच नेत्याला महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते बनवणार होते. पण ऐनवेळी धमकी मिळाल्याने शरद पवारांनी अजित पवारांना विरोधी पक्षनेते बनवले,असे विधान भारतीय जनता पार्टीचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी केलं. अजयकुमार मिश्रा यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीसाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा सातारा दौऱ्यावर आले होते.यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी ते म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी आपलं बलिदान दिलं.धर्मासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या व्यक्तीला ते धर्मवीर नव्हते म्हणणाऱ्या व्यक्तीवर मी काय टिप्पणी करू,मुख्यमंत्री पदासाठी तडजोड करणारी ही लोक आहेत,असा टोलाही अजयकुमार मिश्रा यांनी लगावला.पुढे बोलताना ते म्हणाले की, अजित पवारांवर त्यांचे काकाही विश्वास ठेवत नाहीत.शरद पवार पक्षातील दुसऱ्याच नेत्याला विधानसभा विरोधी पक्षनेता बनवणार होते.ऐनवेळी मिळालेल्या धमकीमुळे अजित पवारांना विरोधी पक्षनेतेपद दिलं, असेही ते म्हणाले.

Related Stories

दिल्ली : दिवसभरात 384 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Tousif Mujawar

६० टक्के पात्र नागरिकांचे लसीकरण पूर्ण; आरोग्य मंत्र्यांची माहिती

Archana Banage

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर ‘कोरोना नाकाबंदी’

Archana Banage

एकादशीला विनापरवाना सोळा विठ्ठलभक्त पंढरीत दाखल

Archana Banage

डीएमकेचे आमदार जे. अन्बझागन यांचा कोरोनामुळे मृत्यू

datta jadhav

”प्रशांत किशोरच्या कुणीही लागू नका नादी कारण…”

Archana Banage