शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या,बहुमत आहे तर ताबडतोब मंत्रिमंडळाचा विस्तार करा
अतिवृष्टीग्रस्त विभागात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केल्याचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले असल्याची माहिती विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी दिली. आज मुंबईत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी अजित पवार यांनी केली. पावसामुळे राज्यातील शेतीचं नुकसान झालं आहे. बहुमत आहे तर ताबडतोब मंत्रिमंडळाचा विस्तार करा. शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. असं असताना मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही हा जनतेचा अपमान आहे. जुलै महिन्यात पावसाळी अधिवेशन दरवर्षी बोलावलं जातं. मात्र यंदा मधल्या काही घडामोडीनंतर अधिवेशन शक्य झालं नाही. २५ तारखेला घेवू असं युती सरकारकडून सांगण्यात आलं. मात्र आज २५ तारीख आली तरी अधिवेशन घेतलं नाही. आता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे कारण पुढे देण्यात आल्याचे सांगत टोला हाणला.
दरवर्षी ऑगस्टमध्ये धरणं भरतात. पण यंदा राज्यातील काही धरणे ६५ टक्के जुलै महिन्यातचं लवकर भरली आहेत. त्यामुळे परिस्थिती गंभीर आहे. गाळ काढल्यानं चिपळूनमध्ये यंदा पुरस्थिती नाही. ज्या भागात शेतकऱ्यांचे पावसाने नुकसान झाले आहे. त्य़ाठिकाणी एसडीआरएफचे नियम बाजूला ठेवून मदत करणं गरजेचं आहे. दरम्यान,नुकसानग्रस्त भागात लवकरच पाहणी करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
तिरुपती देवस्थानचा एक व्हिडिओ व्हायरलं झाला होता यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, राज्याच्या वतीने मिलिंद नार्वेकरांचे नाव दिलं. त्यांच्य़ाशी मी चर्चा केली. मात्र जनतेच्या मनात संभ्रम झाला आहे. महाराजांबाबतच्या खोट्या बातम्या पसरवणं चुकीचं आहे. मुख्यमंत्र्यांनी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करा आणि तातडीने अॅक्शन घ्या.
ओबासी आरक्षण मिळवण्या पाठीमागे अनेकांनी मेहनत घेतली आहे. हे एकाचं काम नाही. मात्र सत्ताधारी त्यांच्यामुळे आरक्षण मिळालं अस म्हणतं श्रेय लाटतं आहेत. मात्र मविआच्या काळात बाटिया आयोग स्थापन केला होता. माहिती गोळा करून देण्यात आली होती. याची सर्व माहिती ग्रामविकास खात्याला पहिली मिळाली त्यामुळे हसन मुश्रीफ याचे साक्षीदार आहेत असेही ते म्हणाले.