Tarun Bharat

सरकार टिकवण्यासाठी उध्दव ठाकरेंना NCP चा पूर्णपणे पाठिंबा – अजित पवार

ऑनलाईन टीम/ तरुण भारत

शरद पवार यांनी बैठकीत अनेक जुने दाखले दिले. सत्तासंघर्षात असे अनेक प्रसंग घडत असतात. राज्यात जी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या संदर्भात पक्षाध्यक्ष सांगतील. पण राष्ट्रवादी सरकार टिकवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी आम्ही उभे राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

नाना पटोलेंच्या विधानावर अजित पवार नाराज

यावेळी ते म्हणाले, बंडखोरी करणाऱ्यांना किंमत मोजावी लागणार असे शरद पवार म्हणाले आहेत. शिवसेना संदर्भात त्यांचे प्रवक्ते बोलतील. ते आमदारांना आवाहन करत आहेत. यावर आमचे लक्ष आहे. आमच्यातील मित्रपक्ष वेगळे स्टेटमेंन्ट करत आहेत. गेल्या अडीच वर्षात निधी देण्यात कोठेही काटछाट केलेले नाही. मी कधीही दुजाभाव केला नाही. मी विकासकामात नेहमीच मदत करत असतो. सत्तेतील सर्वच पक्षांना समान निधी देण्यात आला आहे. कोणत्याही पक्षाला त्रास होणार नाही याची काळजी घेतली असे स्पष्टीकरण त्यांनी केलं. माध्यमांसमोर बोलण्यापेक्षा माझ्याशी बोलले असते तर गैरसमज दूर केला असता. काॅंग्रेस आमदारांना अजितदादा निधी देत नव्हते असा आरोप नाना पटोले यांनी केला होता त्याला अजित पवार यांनी प्रत्यूत्तर दिले.

संजय राऊतांच्या विधानावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु

सरकार टिकवण्याची जबाबदारी तिन्ही पक्षाची आहे. आम्ही सर्वांनी सामंजस्याची भूमिका घेवून या परिस्थितीतून बाहेर पडावे असं माझ मतं आहे. संजय राऊतांचं विधान एेकलं, त्यांना बोलण्याचा हक्क आहे. राऊतांनी कशाच्या आधारावर विधान केलं माहित नाही. ५ वर्षासाठी मविआ सरकार टिकले पाहिजे. पुढील २५ वर्ष सरकार टिकेल असे स्टेटमेन्ट संजय राऊत यांनी याआधीही केलं होत. आता त्यांनी मविआतून बाहेर पडायचे मोठे वक्तव्य केलं आहे त्या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. माझ्या मते असे काही नाही होणार, कदाचित आमदारांना परत आणण्यासाठी त्यांनी बोलले असावे. पण हा त्यांचा अधिकार आहे. पण राऊत बोलले तसे काही ठाकरेंच्या मनात आहे का असे विचारु असेही ते म्हणाले.

Advertisements




Related Stories

मोदी सरकार लोकशाहीचे चार स्तंभ मोडीत काढण्याच्या तयारीत: संजय राऊत

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 6 हजार पेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्राद्वारे सुचवल्या 11 उपाययोजना

Rohan_P

शेतकरी आंदोलक आक्रमक; भाजपा नेत्याचे फाडले कपडे

Abhijeet Shinde

मी गोमुत्राचा अर्क घेते त्यामुळेच मला कोरोना झाला नाही ; खासदार प्रज्ञा सिंह ठाकुर

Abhijeet Shinde

काॅंग्रेसमध्ये नाराजी: आशिष देशमुख सचिवपद सोडणार; राजीनाम्याचं कारण काय?

Abhijeet Shinde
error: Content is protected !!