Tarun Bharat

देहूत बोलण्याची संधी न दिल्याबद्दल अजित पवारांनी सोडलं मौन, म्हणाले..

ऑनलाईन टीम/ तरुण भारत

देहूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे उद्घाटन पार पडले. याकार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह नेते उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमामध्ये मोदींसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भाषण करण्याची संधी दिली. मात्र राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना बोलू दिले नाही. याचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निषेध करत भाजपवर टीका केली. आता या प्रकरणावर अजित पवार पहिल्यांदाच बोलले आहेत.

‘देहूमधील कार्यक्रमाबद्दल मला काही बोलायचं नाही. हा कार्यक्रम होऊन बरेच दिवस झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता दिल्लीत पोहचले आहेत. देहुत अतिशय चांगला कार्यक्रम झाला. देहू वारकरी संप्रदायातील अतिशय महत्वाचे ठिकाण आहे मोठ्या प्रमाणात वारकरी आले होते, पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान मोदी हे या कार्यक्रमाला आले होते. त्यांनी सगळी पाहणी केली होती’ असं अजित पवार म्हणाले.

बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार यांनी राज्यसभा निवडणूक आणि विधानपरिषद निवडणुकीबाबत भाष्य केलं. यावेळी देहूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात भाषण करू दिली नाही,या प्रकरणावर पहिल्यांचा आपली बाजू मांडली.

Related Stories

पंतप्रधान मोदींकडून 75 रुपयांचे विशेष नाण्याचे अनावरण

Abhijeet Khandekar

घरगुती वीज बिल माफीसाठी १० ऑगस्टला राज्यस्तरीय धरणे आंदोलन

Archana Banage

चिंताजनक : देशात २४ तासांत ६९ हजार कोरोनाबाधित

Archana Banage

यवतमाळ : दारूची तल्लफ भागवण्यासाठी सॅनिटायझरचे प्राशन; 7 जणांचा मृत्यू

Tousif Mujawar

बिहारमध्ये नूडल्स कारखान्यात बॉयलर फुटून ६ जणांचा मृत्यू

Archana Banage

महाराष्ट्रात दिवाळीनंतरच शाळा सुरू होणार : वर्षा गायकवाड

Tousif Mujawar
error: Content is protected !!