ऑनलाईन टीम / तरुण भारत :
आगामी 2024 च्या निवडणुकांमध्ये अजित पवार हे कमळाचे बटन दाबा म्हणून प्रचार करतील, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाथरी येथे बोलताना केले.
बावनकुळे यांनी पाथरी येथे एका सभेला संबोधित केले. त्यावेळी ते म्हणाले, आता भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीची महायुती झाली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवार हे कमळाचा प्रचार करतील, आम्ही सुद्धा शिवसेना आणि राष्ट्रवादीचा प्रचार करू. दरम्यान, शरद पवार भाजपसोबत येणार का? या प्रश्नावर ते म्हणाले, काही काळ थांबा वेगळे चित्र तुम्हाला दिसेल. बावनकुळे त्यांच्या या विधानाने चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, संभाजी भिडेंवर बोलताना ते म्हणाले, भिडे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. त्यांचा संबध भाजपसोबत जोडणे योग्य नाही. राहिला विषय भिडे यांनी केलेल्या वक्तव्याचा, तर अशा वक्तव्याची चौकशी करण्याची जबाबदारी सरकारची असते. त्यामुळे चौकशी करुन त्याबाबत सरकार विचार करेल.