Tarun Bharat

राज्यात कुणाचीही हुकूमशाही चालणार नाही ; अजित पवारांनी राज ठाकरेंना खडसावलं

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

जो पर्यंत मशिदीवरील भोंगे खाली उतरवले जाणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरु ठेऊ तसेच दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवू अशी आक्रमक भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackrey) यांनी घेतली आहे. काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा इशारा दिला. तसेच राज यांनी फक्त महाराष्ट्रातील (maharashtra) नाही तर संपूर्ण देशातील भोंगे हटविले पाहिजेत असे बजावताना, सरळ सांगून करत नसतील त्यांना आता एकदा महाराष्ट्राच्या मनगटात काय ताकद आहे, हे दाखवूनच द्या असं आव्हान दिलं. तर ठाकरेंच्या या भाषणावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत टीका केली आहे. महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे त्यामुळे कुणी अल्टिमेटम देऊ शकत नाही. कुणाचीही हुकूमशाही चालणार नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) म्हणाले ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राज्यात कायद्याचं राज्य आहे, कोणीही अल्टिमेटन देऊ शकत नाही. कुणाचीही हुकुमशाही चालणार नाही. जर कोणाला असं वाटत असेल की मी असं म्हटलं तर तसं होईल तर ते चालणार नाही. मग अजित पवारनेही हुकुमशाही केलेली चालणार नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी राज ठाकरेंना खडसावलं आहे. राज ठाकरे कोणत्या काळात भाषण करतात त्यावर त्यांचा सूर अवलंबून असतो अशी टीकाही अजित पवार यांनी केली आहे.

“कायद्याने, संविधानाने, नियमाने ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्याचं पालन सर्वांनाच करावं लागेल. सर्व पक्षाच्या नेत्यांना नागरिकांना, ग्रामस्थांना करावा लागेल,” असं अजित पवारांनी सांगितलं.

.

Related Stories

मटणाच्या सुपामध्ये भाताचे तुकडे आढळल्याने वेटरचा खून

datta jadhav

Andheri East Bypoll : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शिवसेनेला पाठिंबा

Archana Banage

चीनने बळकावली नेपाळची 33 हेक्टर जमीन

datta jadhav

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना कोरोनाची लागण 

Tousif Mujawar

प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला बायडेन यांनी दिली ऑन माईक शिवी

datta jadhav

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना १०० शिवकथेच्या व्याख्यानांनी मानवंदना

Tousif Mujawar
error: Content is protected !!