Tarun Bharat

काहींना टाळता आलं असतं ; मंत्रिमंडळ विस्तारावर अजित पवारांची प्रतिक्रिया…

ऑनलाईन टीम/तरुण भारत

शिंदे-फडणवीस सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यावेळी भाजप आणि शिंदे गटाच्या एकूण १८ आमदारांनी शपथ घेतली. यावेळी विरोधी पक्षातील फक्त अजित पवारांनी हजेरी लावली होती. यावेळी मंत्रिमंडळातून काही नावं टाळता आली असती अशी प्रतिक्रिया विरोधीक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे.

शिंदे सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर अजित पवारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. उशिरा का होईना एकदाचा शपथविधी झाला आणि महाराष्ट्राला मंत्रिमंडळ मिळालं. पण ज्यांना अजून क्लीन चिट मिळाली नाही. अशांना व्यक्तींना मंत्रिमंडळात घेतलं ते टाळलं असतं तर बरं झालं असतं, असं अजित पवार म्हणाले.

तब्बल ३९ दिवसांपासून रखडलेला शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. शिंदे गट आणि भाजपकडून प्रत्येकी ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. शिंदे-फडणवीस सरकारच्या या मंत्रिमंडळात टीईटी घोटाळा प्रकरणात अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या मुलींची प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे टीईटी घोटाळ्यात सत्तारांचे नाव समोर आले आहे. तर संजय राठोड (Sanjay Rathod) यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाचा मान मिळाला. यावरून अजित पवारांनी खोचक टीका केली.

हे ही वाचा : बिहारमध्ये भाजप जदयूची युती तुटली

तसेच पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे संजय राठोड यांना वनमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले होते. पण, आज शिंदे गटाकडून पुन्हा एकदा संजय राठोड यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. संजय राठोड यांना मंत्रिपद देण्यात आल्यामुळे अजित पवार यांच्यासह भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे.

Related Stories

कोरोनाच्या ‘म्यू’ व्हेरिएंटने वाढवली चिंता

datta jadhav

‘मारबर्ग’ व्हायरसने आफ्रिकेत 9 जणांचा मृत्यू,WHO ने बोलावली तातडीची बैठक

Archana Banage

जिल्ह्यातील दहाजणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

Archana Banage

शिरोळ तालुक्यामध्ये दिवसभरात ४४ कोरोनाबाधित

Archana Banage

कोविडबाबतच्या निर्बंधांचे अधिकार स्थानिक प्रशासनाला

Archana Banage

निर्णय घेण्याचे अधिकार लोकप्रतिनिधींकडे द्या

Patil_p