वृत्तसंस्था/ चेन्नई
आगामी इंडियन सुपर लिग फुटबॉल हंगामासाठी चेन्नईन एफसी संघाने स्थानिक फुटबॉलपटू अजितकुमार समवेत नुकताच नवा करार केला आहे.
चेन्नईत जन्मलेल्या अजितकुमार आता 2022 च्या इंडियन सुपर लिग फुटबॉल हंगामात आपल्या घरच्या चेन्नईन एफसी संघाकडून खेळणार आहे. यापुर्वी तो बेंगळूर एफसी संघाबरोबर दोन वर्षे करारबद्ध होता. चेन्नईन एफसी संघाचे सहमालक विटा दानी यांनी अजितकुमारचे स्वागत केले आहे. 25 वर्षीय अजितकुमारने गेल्या दोन इंडियन सुपर लिग हंगामात बेंगळूर एफसी संघाकडून 13 सामने खेळले आहेत. तसेच त्याने एएफसी चषक फुटबॉल स्पर्धेत चार सामने आणि डय़ुरँड चषक फुटबॉल स्पर्धेत पाच सामने खेळले आहेत. 2018 साली त्याने आपल्या व्यावसायिक फुटबॉल कारकीर्दीला प्रारंभ केला. विविध स्पर्धांमध्ये अजितकुमारने 42 सामने खेळले आहेत.