Tarun Bharat

अकाली नेते विक्रम मजीठियांना मिळाला जामीन

Advertisements

उच्च न्यायालयाकडून दिलासा ः 5 महिन्यांनी तुरुंगातून बाहेर पडणार

वृत्तसंस्था/ चंदीगड

अकाली दलाचे नेते विक्रम मजीठिया यांना जामीन मंजूर झाला आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मजीठिया यांना जामीन दिला आहे.  परंतु जामिनाच्या अटींची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मजीठिया यांच्या विरोधात नोंद गुन्हे हे राजकीय सूडाचा भाग असल्याचा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात केला होता.

अकाली दलात नेतृत्वावरून संघर्ष सुरू असताना मजीठिया हे तुरुंगातून बाहेर आले आहेत. शिरोमणी अकाली दलातील नेतृत्व आणि विशेषकरून बादल कुटुंबाच्या विरोधात वातावरण तयार झाले आहे. मजीठिया यांच्या विरोधात काँग्रेसचे सरकार असताना अमली पदार्थांप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. 24 फेब्रुवारीपासून मजीठिया हे पतियाळा मध्यवर्ती तुरुंगात कैद हेते. मजीठिया यांना गुन्हा रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, परंतु तेथे त्यांना उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्देश देण्यात आला होता.

विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने मजीठिया यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला होता. कॅनडात राहणारा अमली पदार्थांचा तस्कर सतप्रीत सत्ता हा मजीठिया यांच्या अमृतसर तसेच चंदीगडमधील शासकीय निवासस्थानात राहत होता. तसेच मजीठिया यांनी सतप्रीतला सुरक्षारक्षक तसेच वाहन पुरविले होते. मजीठिया यांनी अमली पदार्थ तस्करांकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे.

Related Stories

अखिलेश यादव यांची पत्नी-मुलगी पॉझिटिव्ह

Patil_p

पाच वर्षाच्या विहानने एकट्याने केला दिल्ली ते बंगळूरू विमानप्रवास

Omkar B

बीपीएल कुटुंबातील व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाल्यास 1 लाख

Patil_p

कोरोनाची जगाला अजगरमिठी, 24 तासांत 1861 बळी

tarunbharat

देशात 24 दिवसांमध्ये 30 ते 40 कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण

Rohan_P

अमोल कोल्हेंनी अमित शाहांना दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, म्हणाले…

Abhijeet Shinde
error: Content is protected !!