समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव हे एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर चांगलेच संतापले. योगी आदित्यनाथांनी तुम्हाला ‘टोंटी चोर’ म्हटल्याची जाणीव पत्रकाराने अखिलेश यांना करून दिली होती. यावर अखिलेश हे भडकले आणि त्यांनी पत्रकाराला भाजपचा हस्तक संबोधिले आहे. अखिलेश यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याचबरोबर समाजवादी पक्षाने प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराचे छायाचित्र सोशल मीडियावर अपलोड करत गुन्हेगार पत्रकारांदरम्यान स्थान मिळवत असल्याचा दावा केला आहे. गुन्हेगार पत्रकारांमध्ये कसे पोहोचत आहेत याचा तपास मध्यप्रदेश पोलिसांनी करावा अशी मागणी समाजवादी पक्षाने केली आहे.
Previous Articleइमाम, पाद्रींना 12 हजार रुपयांचे वेतन
Next Article निवडणुकीत धर्मगुरु अन् बाबांचाच बोलबाला
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.