Tarun Bharat

अक्षर यात्रा ः राशींचा देश-टॅरो चा संदेश

दिनांक 18-12-2022 ते 24-12-2022

मेष

 कुटुंबातील व्यक्ती सोडून बाहेरची व्यक्ती कितीही जवळची असली तरी तिच्याबरोबर मनातील गोष्टी शेअर करू नका किंवा आपल्या भविष्यातील योजना उघड करू नका पुढे जाऊन यामुळे नुकसान होऊ शकते. या आठवडय़ात घरातील एखाद्या व्यक्तीच्या तब्येतीविषयी काळजी वाटण्याची शक्मयता आहे. आर्थिक बाजू सर्वसामान्य असेल. उधारी वसूल करण्याचा प्रयत्न करण्यास हरकत नाही.

जांभळा हातरुमाल जवळ ठेवावा

 वृषभ

आठवडा तुम्ही घेतलेल्या बऱयाच निर्णयांना योग्य ठरणारा असेल. एखादी व्यक्ती तुमच्याकडे पैशांची मागणी करेल. पण ती व्यक्ती योग्य आहे की नाही याचा निर्णय घेऊन मगच पैसे द्यावे. आरोग्याच्या दृष्टीने थोडा त्रासदायक आठवडा असेल. एखादे इन्फेक्शन त्रास देऊ शकते. नवीन शत्रू तयार होऊ नये याची काळजी घ्यावी लागेल. नोकरीमध्ये पूर्वी केलेल्या चुकीचा आता त्रास होऊ शकतो.

मजुरांना दूध दान द्यावे

 मिथुन

व्यवसाय करणाऱयांना हा आठवडा सर्वसामान्य असेल. नोकरदार वर्गाला कामाचा बोजा वाढल्याने त्रास होऊ शकतो. एखाद्या जाणकार आणि ज्ये÷ व्यक्तींचा सल्ला घेतल्याने नुकसान टळू शकते. तब्येत बिघडल्यास त्याकडे दुर्लक्ष बिलकुल करू नका. पुढे जाऊन याचा जास्त त्रास होऊ शकतो. काम करत असताना आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. कठोर बोलण्याने शत्रुत्व निर्माण होईल.

भीमसेनी कापूर जवळ ठेवावा

कर्क

हा आठवडा उत्तम फलदायी ठरेल. घरी पाहुण्यांचे आगमन होऊ शकते. त्यांच्यावर खर्च करत असताना आपल्या खिशाकडे लक्ष असू द्या. नोकरीनिमित्त किंवा कामानिमित्त बाहेरगावी जाणे संभव आहे. प्रेमविवाह करू इच्छिणाऱयांना योग्य संधी मिळतील. वैवाहिक जीवनामध्ये चढ-उतार असेल. शक्मयतो गैरसमजाला थारा देऊ नका. गुंतवणूक करत असताना योग्य परतावा मिळेल याची काळजी घ्यावी. वडिलांना स्वतःच्या हाताने दूध द्या

सिंह

मागील काही दिवसामध्ये तब्येतीचा त्रास झाला असेल तर तो कमी होईल. नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी प्राप्त होईल. जास्त पैसे मिळतील म्हणून चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करणे टाळावे. विद्यार्थी वर्गाला चांगले यश प्राप्त होईल. नोकरी करणाऱया लोकांना अनेक कामे एकाच वेळी लागल्याने त्रास होऊ शकतो. धनप्राप्तीचे नवीन मार्ग सापडण्याची शक्मयता आहे. प्रेमींसाठी उत्तम काळ आहे.

दीप दान करावे

 कन्या

कोर्टकचेरीसंबंधी किंवा इतर एखाद्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो. एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा विचार कराल. नोकरदार वर्गाला अधिकारप्राप्ती होऊ शकते पण यामुळे गर्व येऊ देऊ नका किंवा अधिकाराचा गैरवापर करू नका. नवीन प्रॉपर्टी  घेण्याचा विचार करत असाल तर कागदपत्रे नीट तपासून घ्या. तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. हवामान बदलाचा परिणाम होइल. वैवाहिक जीवनात थोडा तणाव असेल.

अन्न दान करा

 तूळ

जी कामे अडली असतील त्यांना पूर्ण करण्याकरता जास्त मेहनत घेण्याची गरज आहे. तुमच्या आजूबाजूला असणाऱया लोकांपैकी एखादी व्यक्ती अडचणीच्या वेळेला मदत करेल. आर्थिक बाजू सर्वसाधारण असली तरी योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करा. नातेवाईकाला मदत करण्यासाठी परगावी जावे लागू शकते. स्वतःच्या तब्येतीबरोबरच कुटुंबीयांच्या आरोग्याचीदेखील काळजी घ्यावी लागेल.

गरजूला वस्त्र दान करा

 वृश्चिक

योग्य निर्णय घेतल्यामुळे आणि आपल्या कामामुळे कुटुंबीयांच्या आणि कामाच्या ठिकाणी आणि वरि÷ांच्या कौतुकाला पात्र व्हाल. कोणावरही आंधळा विश्वास ठेवणे महागात पडू शकते. एखाद्या समारंभामध्ये किंवा सामाजिक कामात भाग घेण्याची संधी मिळेल. या संधीचा योग्य वापर केल्यास मानसन्मानात वाढ होईल. वैवाहिक जोडीदारासमोर चुकूनसुद्धा खोटे बोलू नका, नंतर याचा त्रास होईल.

 पाच नाणी दान द्यावी

 धनु

व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला असेल. कामांची गती वाढवावी लागेल. याचबरोबर कामाच्या ठिकाणी थोडा जास्त वेळ खर्च करावा लागेल. यामुळे कुटुंबीयांची नाराजी बघावी लागू शकते. पैशांची आवक वाढल्यामुळे समाधान प्राप्त होईल. तब्येतीच्या छोटय़ामोठय़ा तक्रारी सोडल्या तर जास्त काळजी करण्याची गरज नाही. एखाद्या छोटय़ा समारंभात भाग घेऊ शकाल.

आंघोळीच्या पाण्यात एक चमचा दही घाला

 मकर

 सर्वसाधारण आठवडा असेल. एखाद्या जवळच्या व्यक्तीबद्दल किंवा जवळच्या व्यक्तीकडून महत्त्वाची बातमी कळू शकेल. आणलेल्या कामांना पूर्ण करण्याकरता सगळय़ा प्रकारचा प्रयत्न करावा लागेल. यात शारीरिक आणि मानसिक थकवा येण्याची शक्मयता आहे. सहज बोलण्यात एखाद्या व्यक्तीशी वादावादी होऊन शत्रुत्व येण्याची शक्मयता आहे. मित्रांचा जास्त सहवास टाळा.

हीना अत्तर वापरावे

 कुंभ

नोकरीच्या शोधात आहेत किंवा नवीन व्यापार सुरू करण्याच्या विचारात आहेत त्यांना उत्तम संधी प्राप्त होण्याचे संकेत आहेत. एखादे नवे नाते/रिलेशन सुरू होऊ शकते. जुन्या नात्यांमध्ये काहीशी तेढ जाणवेल. नवीन प्रॉपर्टी घेण्याचा विचार करत असाल तर चांगली बातमी कळेल. घरात एखादा धार्मिक समारंभ साजरा कराल. ज्यामध्ये पाहुण्यांचे आगमन होईल.

मातीच्या भांडय़ात मध घालून घरी ठेवा.

 मीन

कामाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे घाईगडबड करू नका. कामात चुका होऊन कामे करू शकतात. वैवाहिक जोडीदाराचा मदतीमुळे बऱयाचशा कामांना पूर्ण करू शकाल. एखादे काम सुरू केल्यानंतर त्यात खंड पडू देऊ नका. आर्थिकदृष्टय़ा आठवडा चांगला असेल. कामासंबंधी एखादी बातमी कळेल ज्याचा पुढे जाऊन फायदा होऊ शकतो. पथ्य-पाणी व्यवस्थित ठेवले तर तब्येतीवर विशेष परिणाम  होणार नाही.

शालेय वस्तूचे दान द्या.

टॅरो उपायः  

 काही वेळेला जवळच्या व्यक्तीला होस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागते. व्यक्ती पूर्ण बरी झाल्यानंतर परत आणताना ज्या रस्त्याने ऍडमिट करायला आणले तो रस्ता टाळावा. दुसऱया रस्त्याने घरी आणावे. ओवाळून पाय धुवून मग घरी प्रवेश करावा.

Related Stories

आजचे भविष्य गुरुवार दि. 7 मे 2020

Patil_p

आजचे भविष्य 22-10-2021

Amit Kulkarni

आजचे भविष्य गुरुवार दि.26 मे 2022

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 31 ऑक्टोबर 2022

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 13 जुलै 2021

Patil_p

अक्षरयात्रा : राशींचा देश-टॅरो चा संदेश

Amit Kulkarni