केवळ शंभर रुपयांपासून उत्पादन : सवलतीच्या दरात बियाणांचे वितरण : बेरोजगारांना प्रशिक्षणातून रोजगाराची संधी
प्रतिनिधी /बेळगाव
शरीराला अधिक प्रथिने मिळवून देणाऱया अळंबीचे उत्पादन वाढविण्यासाठी बागायत खाते प्रयत्नशील आहे. शिवाय शंभर रुपयांपासून या व्यवसायाला सुरुवात करणे शक्मय असल्याने अनेकांचा याकडे कल वाढला आहे. त्यामुळे अळंबी उत्पादनात वाढ झाली आहे. अळंबी उत्पादन अनेकांना आर्थिक आधार ठरू लागले आहे. गतवषी 5 हजार 500 अळंबी बी-बियाणांच्या पाकिटांची विक्री झाली होती. त्यामुळे यंदादेखील बी-बियाणांच्या विक्रीत वाढ होईल, अशी अपेक्षा बागायत खात्याने ठेवली आहे.
गतवषी बागायत खात्याने 1375 किलो अळंबीचे उत्पादन केले होते. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. दरम्यान, शंभर किलो अळंबीची विक्री झाली होती. त्यामुळे यंदा खात्याने चार टन अळंबी उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. केवळ वीस दिवसात अळंबीचे उत्पादन होत असल्याने याला पसंतीही वाढली आहे. शिवाय बागायत खात्यामार्फत प्रशिक्षण देऊन सवलतीच्या दरात अळंबीचे बियाणे आणि अळंबीही विक्री केली जातात. केवळ सरकारच्या नियमानुसार किलोला केवळ 60 रुपये दर घेतला जातो.
हय़ूम पार्कमध्ये प्रशिक्षणाची सोय
गतवषी खात्यामार्फत 386 जणांना अळंबी उत्पादनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामध्ये निवृत्त व्यक्ती, गृहिणी, बेरोजगार युवकांचा समावेश आहे. केवळ एका लहानशा खोलीत हा व्यवसाय करता येत असल्याने अळंबी उत्पादनाकडे कल वाढला आहे. शेती आणि डोंगरभागातच अळंबीचे उत्पादन होते, असा समज आहे. मात्र, बियाणांचा वापर करून बंदिस्त खोलीतदेखील अळंबी उत्पादन घेतले जाते.
क्लब रोड येथील हय़ूम पार्कमध्ये बागायत खात्याची प्रयोगशाळा आहे. यामध्ये अळंबी, बियाणे, प्रशिक्षण आणि खाण्यासाठी अळंबीची विक्री केली जाते. अळंबी उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी सवलतीच्या दरात बियाणांचे वितरण केले जाते. गतवषी 386 जणांना प्रशिक्षण दिले असले तरी यंदा हजाराहून अधिक अळंबी उत्पादकांना प्रशिक्षण देण्याचे खात्याचे लक्ष्य आहे. त्यामुळे अळंबी उत्पादनात साहजिकच वाढ होणार आहे. शिवाय बाजारातदेखील अळंबी उपलब्ध होणार आहेत.
केवळ शंभर रुपयांपासून या व्यवसायाला सुरुवात करता येते. बागायत खात्याकडून सवलतीच्या दरात बी-बियाणे खरेदी करून एखाद्या हवाबंद खोलीत ही बियाणांची पाकिटे ठेवता येतात. साधारण वीस दिवसांनंतर अळंबी लागवडीला सुरुवात होते. तीन टप्प्यात उत्पादन मिळते. खात्याकडून एखादे पाकिट आणले तरी एका कुटुंबाला पुरेशी अळंबी मिळू शकतात.
सात जिल्हय़ांसाठी बेळगावात प्रयोगशाळा
अळंबी उत्पादन, प्रशिक्षण आणि विक्रीसाठी सात जिल्हय़ांसाठी बेळगावात एक प्रयोगशाळा आहे. या ठिकाणी बेळगावसह धारवाड, हुबळी, कित्तूर, बैलहोंगल आदी शहराच्या उत्पादकांना प्रशिक्षण देऊन बियाणांचे वितरण केले जाते. सात जिल्हय़ांसाठी एकाच ठिकाणी ही प्रयोगशाळा असल्याने उत्पादकांचा प्रतिसादही वाढला आहे.
मात्र, सहजासहजी अळंबीचे उत्पादन होत नाही. एका विशिष्ट कालावधीत नैसर्गिक अळंबीचे उत्पादन होते. हे उत्पादन अगदीच कमी असल्याने दरही अधिक असतो. त्यामुळे सर्वांना खरेदी करणे शक्मय नसते. अशा परिस्थितीत बागायत खात्याकडून अळंबी बियाणे किंवा खाण्यासाठी अळंबी खरेदी करता येतात. विशेषतः केवळ 60 रुपये किलो दराने विक्री केली जाते. त्यामुळे वर्षभर खवय्यांच्या जीभेचे चोचले या अळंबीतून पुरविले जाऊ शकतात.