केवळ शंभर रुपयांपासून व्यवसाय, अनेकांना मिळाला आधार
प्रतिनिधी /बेळगाव
बागायत खात्यामार्फत अळंबी उत्पादनाला प्रोत्साहन मिळावे आणि अर्थार्जन व्हावे, यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. सोमवारी क्लब रोड येथील हय़ूमपार्कच्या कार्यालयात देण्यात आलेल्या अळंबी उत्पादन प्रशिक्षणाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे येत्या काळात उत्पादनात वाढ होऊन अळंबीला चांगले दिवस येतील, असा विश्वास खात्याने व्यक्त केला आहे.
गतवषी बागायत खात्याच्या प्रयोगशाळेत 1375 किलो अळंबीचे उत्पादन झाले होते. यंदा प्रशिक्षण घेणाऱया तरुण-तरुणी, नागरिक आणि बेरोजगारांची संख्या वाढली आहे. केवळ 100 रुपयात घरबसल्या व्यवसाय सुरू करता येत असल्याने प्रशिक्षणाला प्रतिसाद वाढला आहे. त्यामुळे अळंबीच्या उत्पादनात वाढ होणार आहे. हय़ूमपार्क येथील कार्यालयात प्रशिक्षण देण्याबरोबर अळंबी उत्पादनासाठी बियाणे आणि इतर साहित्य सवलतीच्या दरात पुरविले जाते. विशेषतः अळंबी प्रशिक्षण घेणाऱयांमध्ये गृहिणींची संख्या अधिक आहे. त्यामुळे घरबसल्या आर्थिक पाठबळ मिळणार आहे.
बेळगावात 7 जिल्हय़ांसाठी एक प्रयोगशाळा आहे. या ठिकाणी अळंबी प्रशिक्षण, बियाणे, अळंबीपासून तयार होणारे इतर पदार्थ याचे प्रात्यक्षिक दाखविले जाते. दर तीन महिन्यांतून एकदा प्रशिक्षण घेऊन 7 जिल्हय़ांतील नागरिकांना अळंबी उत्पादनासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.
नैसर्गिकरीत्या शेतात आणि वनक्षेत्रात अळंबी उगवतात. त्यामुळे कृत्रिमरीत्याही अळंबीचे उत्पादन घेतले जाते. याबाबत सर्वसामान्यांत जागृती नाही. या प्रशिक्षणामुळे अळंबीबाबत असलेले गैरसमज दूर होणार आहेत.
अनेक आजारांवर गुणकारी
अळंबीचे उत्पादन घेण्याबाबत प्रशिक्षणात सविस्तर मार्गदर्शन दिले जाते. या प्रशिक्षणाचा नागरिकांनी लाभ घ्यावा. अळंबी उत्पादनामुळे अनेक बेरोजगारांना व्यवसायाची संधी प्राप्त होत आहे. अळंबीमध्ये प्रतिकारशक्ती वाढण्याबरोबर अनेक आजारांवर ती गुणकारी ठरतात. त्यामुळे बाजारात याला मागणी अधिक आहे.
– नेत्रांजली भोसले (साहाय्यक निर्देशिका, बागायत खाते)
महिलांमध्येही जागृती करणार
तरुण भारतमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमुळे अळंबी प्रशिक्षण घेता आले. या प्रशिक्षणाबाबत इतर महिलांमध्येही जागृती करणार आहे. घरीच व्यवसाय करता येणार असल्याने अनेक महिलांना अळंबी उत्पादन आधार ठरणार आहे.
– चंद्रलेखा सव्वाशेरी (अळंबी प्रशिक्षणार्थी)