Tarun Bharat

लोखंडी फुफ्फुसांमध्ये अलेक्झेंडरचे जग

Advertisements

एक जीवन असे देखील….

पॉल अलेक्झेंडर हे अर्धांगवायूने ग्रसत असून आता त्यांचे वय 75 वर्षांपेक्षा अधिक आहे. 6 वर्षे वय असताना पॉल यांच्या मानेखालील शरीराने काम करणे बंद केले होते, म्हणजेच त्यांच्या शरीराला अर्धांगवायूचा झटका बसला होता. अशा स्थितीत दुसरा कुणी असता तर जगण्याची आशाच सोडून दिला असता, परंतु पॉल यांची हिंमत आणि त्यांच्या आईची आशा या संकटावर मात करत गेली.

1946 मध्ये अमेरिकेत जन्मलेले पॉल 6 वर्षांचे असताना त्यांच्या मानेला खेळताना ईजा झाली. पॉल यांना त्यानंतर श्वास घेण्यास त्रास होत होता आणि शरीराला अर्धांगवायूने घेरले होते, ते हलू देखील शकत नव्हते. अशा स्थितीत डॉक्टरांनी गांभीर्य ओळखून उपचार केले. पॉल यांना तीन दिवसांनी शुद्ध आली आणि ते एका लोखंडी यंत्रात कैद असल्याचे त्यांना दिसून आले, वैद्यकीय भाषेत या यंत्राला आयर्न लंग्स मशीन म्हटले जाते.

अर्धांगवायूने ग्रस्त रुग्णांसाठी हे यंत्र एखाद्या यंत्रापेक्षा कमी नाही. परंतु यात राहणे खरोखरच मोठी गोष्ट आहे, प्रत्येक रुग्णाला हे शक्य नाही. हे यंत्र रुग्णांयच फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजन भरण्याचे काम करते, यामुळे तो जिवंत राहू शकतो.  पॉल यांच्या या अवस्थेमुळे त्यांना अनेक विद्यापीठांनी प्रवेश नाकारला होता. तरीही त्यांनी हिंमत न हारता डलास येथील दक्षिण मेथोडिस्ट विद्यापीठात प्रवेश घेतला आणि मग ऑस्टिनमधील टेक्सास विद्यापीठात लॉ स्कूलमध्ये प्रवेश घेतला. पॉल यांनी डलास आणि फोर्ट वर्थमध्ये वकील म्हणून काम केले आहे.

पुस्तक लेखन

पॉल यांनी स्वतःच्या जीवनावर एक पुस्तक लिहिले आहे. याचे नाव ‘माय लाइफ इन ऍन आयर्न लंग’ आहे. जीवन कसेही असो, मोठय़ा आव्हानांना सामोरे जाऊनच तुम्ही लक्ष्य गाठू शकता असे पॉल यांचे म्हणणे आहे. पॉल यांच्या जीवनाकडे पाहिल्यास जीवनात अनेक संकट येतात, परंतु तुम्ही तुमची वाटचाल सुरू ठेवायला हवी असा संदेश मिळतो.

Related Stories

भारतात लवकरच दाखल होणार ‘राफेल’ विमानांची दुसरी तुकडी

Rohan_P

नातीसोबत 88 वर्षीय वृद्ध झाला ग्रॅज्युएट

Patil_p

मुलीचा पहिला वाढदिवस, पूर्ण शहराला पार्टी

Patil_p

‘दगडूशेठ गणपतीला’ नववर्षाच्या प्रारंभी भाविकांची दर्शनासाठी रिघ

Rohan_P

Special Story; रणजी ट्रॉफी : मध्यप्रदेशचा बलाढ्य मुंबईवर विजय

Kalyani Amanagi

सेकंड हँड गोष्टींनी चमकविले नशीब

Amit Kulkarni
error: Content is protected !!