तरुणभारत ऑनलाइन टीम
नुकतचं बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर बोहल्यावर चढले आहेत. त्यांचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या आलियाचा आणखी एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. आलिया लग्नानंतर प्रथमच बाहेर पडली आहे.आणि तिच्या या लग्नानंतरच्या फर्स्ट लुकची चांगलीच चर्चा रंगली आहे.
आलियाने बेबी पिंक सलवार-कमीज आणि मॅचिंग दुपट्टा परिधान केला आहे . या साध्या लुक मध्ये आलिया खूप सुंदर दिसत आहे. याबरोबरच आलिया ने तिची लग्नाची अंगठी देखील परिधान केली आहे.
इ टाईम्स च्या वृत्तानुसार आलिया तिच्या आगामी चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चे शूटिंग पूर्ण करण्यासाठी राजस्थानच्या जैसलमेरला रवाना झाली आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन यांच्याही भूमिका आहेत.यासोबतच आलिया आणि रणबीरचा पहिला चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत.