‘हार्ट ऑफ स्टोन’ची प्रदर्शन तारीख जाहीर
आलिया भट्टसाठी मागील वर्ष अत्यंत उत्तम राहिले. तिचे मागील वर्षी प्रदर्शित झालेले सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले. याचबरोबर मागील वर्षी ती रणवीर कपूरसोबत विवाहबद्ध झाली. तसेच हॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी तिला मिळाली. आलिया हॉलिवूडमध्ये स्वतःचे पदार्पण करण्यासाठी तयार आहे. तिचा हॉलिवूड चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोन’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
2023 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱया हॉलिवूड चित्रपटांची आणि सीरिजची घोषणा करण्यात आली आहे. यात आलियाचा ‘हार्ट ऑफ स्टोन’ चित्रपट देखील सामील आहे. नेटफ्लिक्सकडून एकूण 16 चित्रपट आणि सीरिजयच प्रदर्शनांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे.
आलियाचा हॉलिवूड पदार्पणातील चित्रपट 11 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर झळकणार आहे. या चित्रपटात आलियाचा ऍक्शन अवतार दिसून येणार आहे. हार्ट ऑफ स्टोन चित्रपटात आलिया आणि कीया धवन देखील भूमिका साकारत आहे. चित्रपटाची मुख्य नायिका गॅल गॅडोट आणि जेमी डोर्नन यात अत्यंत विशेष भूमिकेत दिसून येणरा आहेत. आलियाचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत