Tarun Bharat

अलीगडमध्ये मांस प्रकल्पात वायूगळती, 100 हून अधिक कर्मचारी बेशुद्ध

Advertisements

वृत्तसंस्था /अलीगड

उत्तरप्रदेशच्या अलीगडमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. मांस प्रकल्पात विषारी वायूची गळती झाल्याने 100 हून अधिक कर्मचाऱयांची प्रकृती बिघडली आहे. वायूगळतीनंतर कर्मचाऱयांना त्वरित रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर प्रशासनाचे पथक वायूगळतीचे कारण जाणून घेण्यासाठी चौकशी करत आहे. ही दुर्घटना अल दुआ मांस प्रकल्पात झाल्याचे सांगण्यात येते. या प्रकल्पात गुरुवारी अचानक काम करणारे कर्मचारी खाली कोसळू लागले. अधिकाऱयांनी यासंबंधी चौकशी सुरू केल्यावर वायूगळतीचा प्रकार उघड झाला होता. या घटनेमुळे 100 हून अधिक जणांची प्रकृती बिघडली असून या महिला कर्मचाऱयांचे प्रमाण अधिक आहे. संबंधित प्रकल्पाच्या संचालकाने वायूगळतीचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे.

Related Stories

दिल्लीत कोरोनाबाधितांची संख्या 5 लाख 10 हजार 630 वर

Tousif Mujawar

चेन्नईत दीड कोटीचे सोने जप्त

Patil_p

नेहरू विद्यापीठात पुन्हा हिंसाचार

Patil_p

दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त बालाजी श्रीवास्तव

Patil_p

‘बीएसएफ’मध्ये पुन्हा हत्या-आत्महत्या

Patil_p

पंतप्रधान मोदींचा ‘स्वदेशी’चा नारा

Patil_p
error: Content is protected !!