Tarun Bharat

डिचोली तालुक्यातील सर्व उमेदवारी अर्ज छाननीत ग्राह्य

एकूण अर्जांची संख्या 460 : चार उमेदवार बिन विरोध,आज अर्ज मागे घेण्याच्या मुदती नंतर चित्र स्पष्ट

डिचोली/प्रतिनिधी

डिचोली तालुक्मयातील 17 पंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांनी भरलेले सर्व उमेदवारी अर्ज छाननीनंतर ग्राह्य धरण्यात आले आहे. एकही अर्ज बाद झाला नाही. दोन अर्ज असलेल्यांचा प्रत्येकी एक अर्ज राहिल्याने आता तालुक्मयातील एकूण उमेदवारी अर्जांची संख्या 460 झाली आहे. निवडणूक अधिकाऱयांकडे एकूण 488 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.

आमोणा पंचायतीत एकूण 29 अर्ज ग्राह्य झाले, कारापूर सर्वण पंचायतीत 44 अर्ज ग्राह्य झाले. कुडणे पंचायतीत 23 अर्ज ग्राह्य झाले. नाव्हेली पंचायतीत 35 अर्ज, पारी कोठंबी 46 अर्ज, सुर्ल पंचायतीत 27 अर्ज, वेळगे  24 अर्ज, अडवलपाल  12 अर्ज, लाटंबार्से  30 अर्ज, मये वायंगिणी 42 अर्ज, मेणकुरे धुमासे 19 अर्ज, मुळगाव 24 अर्ज, नार्वे 16 अर्ज, वन म्हावळींगे कुडचिरे 23 अर्ज, पिळगाव 20 अर्ज, साळ पंचायतीत 24 अर्ज, शिरगाव पंचायतीत 22 अर्ज. असे अर्ज छाननीनंतर राहिले आहेत. आज बुध. दि. 27 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत अर्ज मागे घेतल्यानंतर प्रत्येक पंचायतींचे व प्रभागाचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Related Stories

तृणमूल काँग्रेस गोव्यात येण्यामागे ‘रिंगमास्टर’चा हात

Amit Kulkarni

वास्कोतील महामार्गाचे दुखणे चालूच

Amit Kulkarni

सांखळी नगराध्यक्षावरील अविश्वास ठरावासाठी 16 रोजी बैठक बोलवा

Amit Kulkarni

सांगे येथे आयआयटी समर्थक – विरोधकांत संघर्ष

Amit Kulkarni

गोव्यात 41 वेलनेस केंद्रे सुरू करणार

Amit Kulkarni

‘सिली सोल्स’च्या अडचणीत वाढ

Patil_p