Tarun Bharat

सण-समारंभा साठी प्रोफेशनल मेकअप कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर

Makeup Tips : मेकअप म्हटलं की बऱ्याच जणींच्या जवळचा आवडीचा विषय.कोणताही सण-समारंभ, लग्न किंवा अगदीच वाढदिवस असला तरी बेसिक मेकअप हा करावाच लागतो. याशिवाय आपला लुक चांगला वाटतं नाही. मात्र काहींना मेकअपची भिती वाटते. पण चांगले प्रोडक्ट वापरले की याचा कोणताही दुष्पपरिणाम होऊ शकत नाही. याशिवाय तुम्ही मेकअप केल्यानंतर थोड्या वेळाने तो काळा पडायला लागतो. याचं नेमकं कारण काय असतं, मेकअप परफेक्ट कसा करावा. तुम्हाला जर कोणत्याही सण-समारंभाला, पार्टीला जाताना नेमका कसा मेकअप करावा याच्या टिप्स जाणून घेवूया.

कोणत्याही मेकअपची सुरुवात करताना सुरुवातीला चेहरा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर टोनरचा वापर करा. टोनर लावून झाल्यावर त्यावर माॅश्चराईझर लावा. त्यानंतर प्रायमर लावा. संपूर्ण चेहऱ्याला प्रायमर व्यवस्थित लावून घ्या. त्यानंतर कलर करेक्टरसाठी यलो आणि रेड कन्सीलर मिक्स करून लावा. तुमच्या चेहऱ्यावर जर डाग असतील तर ते लपवण्यासाठी याचा वापर करता येतो. तुम्हाला जर पिंपल्स किंवा वांग असेल तर डायरेक्ट फौंडेशन न लावता त्याठिकाणी कन्सिलर लावून घ्या. हे लावत असताना नाक आणि नाकाच्या शेजारी किंवा ज्याठिकाणी डाग आहेत अशा ठिकाणी हाताने किंवा ब्रशने डॅप करून घ्या. कधीकधी मेकअप केल्यानंतर थोड्या वेळाने चेहरा काळवंडतो याचे कारण म्हणजे डागाच्या ठिकाणी कन्सिलर न लावता डायरेक्ट फौंडेशन वापरू नका.

त्यानंतर चेहऱ्याला कटिंग करून घ्या.यासाठी नाक आणि नाकाच्या शेजारी चिक्सवर कटिंग पेन्सिलचा वापर करून व्यवस्थित काॅन्टरिंग करून घ्या. यासाठी ब्रश वेगळा वापरा. डोळ्यांचा मेकअप करण्यासाठी डोळ्याखाली थोडी पावडर लावून घ्या. हेवी मेकअप करण्यासाठी डोळ्यांचा मेकअप खूप गरजेचा असतो. साडी कोणती नेसणार आहात त्यानुसार शाडो वापरा. यानंतर काजळ लावून घ्या यासोबतच लायनर लावा. त्यानंतर मस्करा लावा. पावडर काॅन्टरिंग करून घ्या. यासाठी तिरक्या ब्रशचा वापर करा. त्यानंतर ब्लॅशिंग करून घ्या.यानंतर साडीनुसार लिपस्टिक लावून घ्या. तुमची साडी कशी आहे त्यानुसार केस मोकळे सोडा किंवा बन घाला.

Related Stories

क्रोशाचा मॉडर्न अवतार

tarunbharat

असे मेंटेन करा तुमचे कुरळे केस

Kalyani Amanagi

घरच्या घरी करा Skin Care Routine; जाणून घ्या ट्रिक्स

Archana Banage

लेहेंगा चोलीचा असाही वापर

Amit Kulkarni

यार्डेजच्या साडय़ा

Omkar B

फेशिअल केल्यावर या चुका टाळा

Kalyani Amanagi
error: Content is protected !!