राधानगरी/प्रतिनिधी
Radhanagari Dam : राधानगरी धरणाचा दरवाजा क्रमांक 6 हा सोमवारी रात्री 8 वाजून 30 मिनिटाने उघडला मात्र धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणाचा एक दरवाजा बुधवारी रात्री 12 वाजून 51 मिनिटाने बंद झाला आहे, त्यामुळे सर्व दरवाजे बंद झाले आहेत.
धरण 10 ऑगस्टमध्ये पूर्ण क्षमतेने भरून धरणाचे पाच दरवाजे खुले झाले होते. यावर्षी तीन वेळा दरवाजे उघडले गेले आहेत. मागील वर्षी 7 वेळा स्वयंचलित दरवाजे उघडले होते. सध्या बीओटी च्या जलविद्युत प्रकल्पातून 1600 क्यूसेकने विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरू आहे. संभाव्य पूर परिस्थिती रोखण्यासाठी जलसंपदा विभागाने पाण्याचे योग्य नियोजन केल्याने पुराचा फटका बसला नाही.