Tarun Bharat

एस.टीची चाके आली पुर्वपदावर

Advertisements

प्रतिनिधी/ सातारा

 मगील अनेक महिन्यांपासुन संपावर असलेले सातारा आगारातील सर्व कर्मचारी आता पुन्हा पुर्वी प्रमाणे सेवेत रूजु झाले आहेत. त्यामुळे आता पुर्वीप्रमाणेच एस.टीच्या सर्वच फेऱया सुरळीत पणे सुरू करण्यात आल्या आहेत. त्यातच आता यात्रा, सण-समारंभांचा मौहोल असल्याने एस.टी आगारात ही प्रवाश्यांची एकच गर्दी झालेली पहावयास मिळत आहे.

  कर्मचाऱयांचे शासकीय सेवेत विलगीकरण करण्यात यावे, या मुद्दय़ावर हा संप पुकारण्यात आला होता. संपातील काही कर्मचाऱयांना बडतर्फ ही करण्यात आले होते. पण आता कर्मचाऱयांना अखेरची सुचना दिल्याने मागील पंधरा दिवसातील आंदोलनातील 1618 कर्मचारी वर्ग हे पुन्हा सेवेत रूजु झाले आहेत. पण बडतर्फ केलेल्या काही कर्मचाऱयांची सुनावणी होणे अद्याप बाकी आहे.

 कर्मचारी हे पुर्वी प्रमाणे सेवेत रूजु झाल्याने लांब पल्याच्या गाडय़ा व ग्रामीण भागातील सर्व एसटीची वाहतुक पुर्व पदावर करण्यात आली आहे. तसेच परिसरात असणारे फेरी विक्रेते, लहान सहान दुकानदारांकडुन ही समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

सर्व फेऱया सुरू

 सातारा आगारातील ही सर्व फेऱया सुरू झाल्या आहे. लांब पल्याच्या फेऱया ही सुरू झाल्या असुन मुंबईच्या-14, बोरिवली-14, जादा-10, विवजापुर-3, सोलापुर-3 तसेच ग्रामीणच्या सर्व फेल्या सुरू आहेत. शनिवारी चालक  248 व वाहक 228 सेवेत रूजु होते रूजु होते.

Related Stories

मुख्यमंत्री पदावर येताच एकनाथ शिंदेंच्या ‘या’ घोषणा

Abhijeet Khandekar

हडपसर, पुणे येथून आलेल्या मृत व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह

Archana Banage

वाढता मृत्यूदर वाढवतोय चिंता : उच्चांकी 38 बळी

Patil_p

आवळी जवळ अपघातात दुचाकीची अॅपेरिक्षाला धडक आठ जखमी

Archana Banage

सातारकरांना मोठा दिलासा : पंधरा जण कोरोनामुक्तहून घरी

Archana Banage

पार कुमठे गावच्या हद्दीत गुराख्यांना दिसला ब्लॅक पँथर

datta jadhav
error: Content is protected !!