Tarun Bharat

निपाणी भागातील खेळाडूंना सर्वतोपरी सहकार्य

अरिहंत चषक फुटबॉल स्पर्धेचे थाटात उद्घाटन

प्रतिनिधी/ निपाणी

निपाणी शहर व ग्रामीण भागातील युवक, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून कटिबद्ध आहोत. केवळ राजकरण न करता आजवर कला, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबवले आहेत. यापुढेही राबवणार आहोत. परिसरातून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू घडावेत यासाठी जे सहकार्य लागेल ते देण्यात आपण कुठेच कमी पडणार नाही, अशी ग्वाही युवा नेते उत्तम पाटील यांनी दिली.

येथील समर्थ व्यायामशाळेच्या मैदानावर अरिहंत उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अरिहंत समुहातर्फे अरिहंत चषक या भव्य आंतरराज्य फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन शनिवारी युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत व प्रास्ताविक अकॅडमीचे सचिव ओंकार शिंदे यांनी केले. बोरगावच्या नगरसेविका शोभा आवले, माजी नगराध्यक्षा सुजाता पाटील, सुरेखा घाळी, गिरिजा वठारे यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. यानंतर हवेत फुगे सोडल्यनंतर उत्तम पाटील यांनी फुटबॉलला किक मारून स्पर्धेचे उद्घाटन केले.

माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर म्हणाले, उत्तम पाटील यांनी निपाणी परिसरातील खेळाडूंना वेळोवेळी स्पर्धांच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळेच युवा वर्ग उत्तम पाटील यांच्या पाठीशी दिसत आहे. निपाणीत प्रथमच इतक्मया मोठय़ा प्रमाणात स्पर्धा भरवून खेळाडूंना तसेच फुटबॉलप्रेमींना चांगली पर्वणी दिल्याचे सांगितले. यावेळी पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते खेळाडूंना दिल्या जाणाऱया जर्सीचे अनावरण करण्यात आले.

याप्रसंगी निपाणी फुटबॉल अकॅडमीचे अध्यक्ष धनंजय मानवी, श्री समर्थ व्यायामशाळा मंडळाचे अध्यक्ष डॉ. सी. बी. कुरबेट्टी, डॉ. सुनील ससे, राजेश देसाई सरकार, माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील, नगरसेवक संजय सांगावकर, दिलीप पठाडे, शौकत मनेर, संजय पावले, शेरू बडेघर, दत्तात्रय नाईक, दीपक सावंत, अशोककुमार असोदे, अनिस मुल्ला, डॉ. जसराज गिरे, माजी जि. पं. सदस्य चेतन स्वामी, जयवंत कांबळे, जत्राट ग्रा.पं. अध्यक्ष रोहन भिवसे, ग्रा. पं. सदस्य निरंजन पाटील, प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी, गजानन कावडकर, ऍड. अमर शिंत्रे, अनिल संकपाळ, सचिन खोत, इम्रान मकानदार, रमिज मकानदार, अनिल गुरव, सचिन पोवार, विश्वनाथ पाटील, शशिकांत नेसरे, रघुनाथ चौगुले, पिंटू पाटील यांच्यासह निपाणी शहर आणि परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व फुटबॉलप्रेमी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सचिन फुटाणकर यांनी सूत्रसंचालन केले.

पहिल्या सामन्यात बेळगावची बाजी

अरिहंत चषकचा पहिला सामना बेळगाव बुफा विरुद्ध कोल्हापूर येथील आर. के. नगर संघामध्ये झाला. या सामन्यात बेळगाव संघाने 1-0 अशी आघाडी घेऊन विजय मिळविला. स्पर्धेचा दुसरा सामना कोल्हापूर येथील बालगोपाल विरुद्ध बेळगाव साईराज या संघांमध्ये झाला. बालगोपाल संघाने उत्कृष्ट खेळ दाखवत 4-0 अशा गोलफरकाने विजय मिळविला. तिसरा सामना निपाणी फुटबॉल अकॅडमी विरुद्ध मंगळवार पेठ मिरज या संघांमध्ये निर्धारित वेळेत बरोबरी झाल्यानंतर  पेनल्टी शूटआऊटवर मिरज संघ विजयी ठरला.

Related Stories

‘त्या’ चुकीमुळे ऋषभ पंतचे ट्रोलिंग

Omkar B

गुजरात जायंटस्चा दुसरा विजय

Patil_p

‘अशी धडकली कार डिव्हायडरला’… ऋषभ पंतनेच सांगितले

Rohit Salunke

इटलीची पाओलिनी विजेती

Patil_p

क्रिकेट ऑस्ट्रेलिया संघासाठी मानसोपचार तज्ञ नेमणार

Patil_p

सात्विकसाईराज-चिराग उपांत्य फेरीत

Patil_p