एक लाख क्युसेक पाण्याची आवक अन् विसर्ग ः कृष्णा, वेदगंगा, दूधगंगा काठावर अलर्ट
वार्ताहर /एकसंबा, जमखंडी
पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायम असल्याने वेदगंगा, दूधगंगा व कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ होत आहे. वाढती पाणीपातळी लक्षात घेता नदीकाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. मंगळवारी कृष्णा नदीच्या पाणीपातळीत तीन तर दूधगंगा नदीच्या पाणीपातळीत दोन फुटांनी वाढ झाली आहे.
कृष्णा नदीची धोकापातळी 537 मीटर असून मंगळवारची पाणीपातळी 530.51 मीटर इतकी होती. तर दूधगंगा नदीची धोकापातळी 538 मीटर असून मंगळवारची पाणीपातळी 534.53 मीटर इतकी होती. दरम्यान आलमट्टी जलाशयाच्या सर्व 26 दरवाजांमधून एक लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
17 तारखेपर्यंत पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस असल्याने पाण्याचे मोठे प्रकल्प, धरणे, धबधबे या ठिकाणी वर्षापर्यटनास न जाण्याच्या सूचनाही प्रशासनाकडून दिल्या आहेत. यामुळे साहजिकच पुढील पाच दिवस तरी नदीच्या पाणीपातळीत हमखास वाढ होणार असल्याचे संकेत हवामान विभागाच्या अंदाजानुसार दिसत आहेत. धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणांमध्ये पाण्याची आवक वाढत आहे. तीन, चार दिवसांत बऱयाच धरणांचा पाणीसाठा 50 टक्क्यांपर्यंत आला आहे.
वाढती पाण्याची आवक लक्षात घेता काही प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे. यामध्ये वारणा धरणातून 807 क्मयुसेक, काळम्मावाडी धरणातून 700 क्मयुसेक तर राधनगरी धरणातून 1350 क्मयुसेक वेगाने विसर्ग सुरू आहे.
मंगळवारी दुधगंगा नदीत 1 हजार 760 क्मयुसेकने प्रवाहात वाढ झाली असून 21 हजार 120 क्मयुसेकने विसर्ग होत आहे. राजापूर बंधाऱयातून 8 हजार 875 क्मयुसेक विसर्ग वाढला असून तो 77 हजार 875 क्मयुसेकने होत आहे. एकूण कल्लोळ कृष्णा नदीपात्रात 10 हजार 635 क्मयुसेक पाण्याची आवक वाढली असून एकूण 98 हजार 995 क्मयुसेक पाण्याचा विसर्ग होत होता. कृष्णा नदीचा प्रवाह जवळपास एक लाखाच्या घरात आला आहे. याबरोबरच निपाणी, चिकोडी तालुक्यातही पावसाचे प्रमाण वाढले आहे.
हिप्परगीतून 89 हजार क्युसेक विसर्ग
आलमट्टीच्या 519.06 मीटर उंचीच्या धरणाची 517.17 मीटर पाणी साठवणूक क्षमता आहे. सध्या 87.865 टीएमसी पाणी साठा आहे. सध्या पाण्याचा विसर्ग होत असल्याने धरण क्षेत्रातील पाणलोट भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जमखंडी तालुक्यातील हिप्परगी धरणात सध्या 90 हजार क्युसेक पाण्याची आवक होत असून 89 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 524.87 मीटरच्या धरणात सध्या 520.90 मीटर पाणी आहे. कृष्णेचा उगम असलेल्या महाबळेश्वर येथे 13 रोजी गंगा पूजन होणार आहे. यंदाचे गंगापूजन जलसंपदा मंत्री गोविंद कार्जोळ यांच्या हस्ते होणार आहे.