Tarun Bharat

मडगाव पालिकेत डेटा ऑपरेटरच्या जागा भरताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

नगरसेवक घनश्याम प्रभू शिरोडकर यांचा आरोप

प्रतिनिधी /मडगाव

मडगाव नगरपालिकेत डेटा ऑपरेटरच्या पाच जागा भरताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मडगाव पालिकेचे माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक घनश्याम प्रभू शिरोडकर यांनी काल पत्रकार परिषदेत केला. मडगाव पालिका मंडळाला अंधारात ठेऊन नोकर भरती केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

गोवा हय़ूमन रिसोर्सेसमधून हे पाच डेटा ऑपरेटर घेण्यात आले आहे. त्यांना प्रत्येकी 27 हजारांचे वेतन दिले जाणार आहे. या पाच डेटा ऑपरेटरना नियुक्ती पत्रे देखील देण्यात आल्याची माहिती नगरसेवक घनश्याम शिरोडकर यांनी दिली. गेल्या पालिका मंडळाच्या बैठकीत 3 हजार रूपयाच्या पगारावर पालिकेत काम करण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना इंटर्नशिपच्या अंतर्गत सामावून घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तो निर्णय बाजूला ठेवून थेट हय़ुमन रिसोर्सेसमधून पाच जणांना डेटा ऑपरेटर म्हणून घेण्यात आल्याने हे प्रकरण नक्कीच भ्रष्टाचाराचे असल्याचा आरोप त्यांनी केला.

पालिकेच्या इतिवृत्तात ‘इतर कोणताही विषय’ अंतर्गत नोंद करून या पाच डेटा ऑपरेटरेना घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र, या संदर्भात संपूर्ण पालिका मंडळ अंधारात असल्याचे त्यांनी सांगितले. इतिवृत्ताला अद्याप मान्यताच मिळालेली नाही. त्या अगोदरच पाच डेटा ऑपरेटरांची कशी नेमणूक केली असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. या पाच डेटा ऑपरेटरना घेताना त्यांच्या मुलाखती घेतलेल्या नाहीत. त्यांची परस्पर नेमणूक करण्यात आलेली. ही नेमणूक म्हणजे मडगाव, फातोर्डा व कुडतरीतील इच्छुक उमेदवारांवर अन्याय असल्याचे ते म्हणाले. हय़ूमन रिसोर्से खात्याला कोणी तरी निवडक नावे दिली असून त्यांचीच निवड करण्यात आली असावी अशी शक्यता ही त्यांनी व्यक्त केली आहे.

एफडीतून दिले जाते वेतन

मडगाव पालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. त्यामुळे कर्मचाऱयांना वेतन देताना कायम ठेवी खर्च करून त्यातून वेतन दिले जाते. अशावेळी दर महिना 27 हजार वेतन पाच डेटा ऑपरेटरना हा पालिकेवर येणारा अतिरिक्त आर्थिक बोजा असेल श्री. शिरोडकर म्हणाले.

हय़ूमन रिसोर्सेकडून मागितले होते डेटा ऑपरेटर

दरम्यान, या संदर्भात पालिकेचे मुख्याधिकारी रोहित कदम यांची भेट घेतली असता ते म्हणाले की, पालिकेला कुशल कर्मचाऱयांची कमतरता होती व पालिकेला तातडीने पाच डेटा ऑपरेटरची आवश्यकता होती. त्यामुळे हय़ूमन रिसोर्सेस खात्याकडे पत्रव्यहार करून पाच डेटा ऑपरेटर पुरविण्याची मागणी केली होती. त्या प्रमाणे पाच डेटा ऑपरेटरना नियुक्त केल्याचे सांगितले. मात्र, अद्याप पालिका मंडळाच्या बैठकीत त्याला मान्यता घेतली नसल्याने त्याची नियुक्ती स्थगित ठेवण्यात आली आहे. तसेच पाच डेटा ऑपरेटरच्या नियुक्तीत कोणताच भ्रष्टाचार झाला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

1 जुलै पासून पालिकेचे कामकाज ऑनलाईन होत असल्याने त्यासाठी तातडीने पाच डेटा ऑपरेटरची आवश्यकता होती. त्यामुळे हय़ूमन रिसोर्सकडून कुशल उमेदवार घ्यावे लागल्याचे त्यांनी सांगितले. पालिकेच्या कामकाजात खंड पडू नये यासाठी ही प्रक्रिया करावी लागल्याचा दावा त्यांनी केला. तसेच प्रत्येक गोष्ठीसाठी पालिका मंडळाची मान्यता घेणे आवश्यक नसल्याचे मत ही त्यांनी मांडले.

आपल्याला काहीच माहीत नाही

या संपूर्ण प्रकरणात नगराध्यक्ष लिंडन परेरा यांची भेट घेतली असता, आपल्याला या प्रकरणी काहीच माहीत नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. डेटा ऑपरेटर घेण्यासाठी हय़ूमन रिसोर्सकडून उमेदवार घेण्यात आले तरी त्यांची नियुक्ती स्थगित ठेवावी असे आपण मुख्याधिकाऱयांना सांगितल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

वीज पुरवठा खंडीत

Amit Kulkarni

मुरगावात पालिका निवडणुकीसाठी ईच्छुक उमेदवारांची जय्यत तयारी, राखीवतेमुळे सुप्त भिती आणि चिंताही, मात्र, काहींचा उघडपणे प्रचार

Amit Kulkarni

नड्डा यांची मंत्री, आमदारांशी चर्चा

Patil_p

काणकोणातील किनाऱयांवर देशी पर्यटकांची गर्दी

Patil_p

रविवारी राज्यात 11365 जणांचे लसीकरण

Amit Kulkarni

मडकईतील जॉर्गस ट्रकच्या कामाला आजपासून सुरुवात

Patil_p