Tarun Bharat

सुलतानपूर येथील अनुसूचित समाजाला स्मशानसाठी जागा द्या

Advertisements

प्रतिनिधी /बेळगाव

रायबाग तालुक्मयातील कप्पलगुद्दी ग्राम पंचायतच्या अखत्यारित येणाऱया सुलतानपूर गावातील अनुसूचित जातीच्या समाजाला स्मशानभूमी नाही. त्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. तेव्हा तातडीने या समाजासाठी स्मशानभूमी उपलब्ध करावी, अशी मागणी या गावातील अनुसूचित जातीच्या नागरिकांनी केली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून स्मशानभूमी नसल्याने मादार समाजाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मृत्यू झाल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार कोठे करायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या लोकसंख्या वाढत चालली आहे. तेव्हा तातडीने स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करावी. याचबरोबर स्मशानभूमी उभारण्यासाठी निधीही द्यावा, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.

महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बी. एम. मादार, यु. एस. मादार, लक्काप्पा मादार यांच्यासह समाजातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related Stories

पुन्हा मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

mithun mane

कालमणी येथे शेतात आढळले ट्रकभर गोमांस

Patil_p

तालुक्यातील दहावी पूर्वपरीक्षा कडकच घेणार

Amit Kulkarni

एनसीसी विद्यार्थ्यांच्या ट्रेकचा सांगता समारंभ

Amit Kulkarni

खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी मजहर खानापुरी

Rohan_P

बेळगावचा युवक करणार सुदृढ भारतासाठी सायकल प्रवास

Patil_p
error: Content is protected !!